ETV Bharat / spiritual

'या' राशींना लाभेल प्रिय व्यक्तीचा सहवास; जाणून घ्या आजचं राशीभविष्य - Horoscope 24 September 2024 - HOROSCOPE 24 SEPTEMBER 2024

Horoscope 24 September 2024 : आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, कामाच्या ठिकाणी कसा जाईल दिवस, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, ते जाणून घेऊ ईटीव्ही भारतवरील या राशीभविष्यात.

Horoscope 2024
राशीभविष्य 2024 (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2024, 12:11 AM IST

  • मेष (ARIES) : चंद्र आज वृषभ राशीत आहे. दिवसाची सुरूवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्यानं इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती अस्थिर असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. दुपारनंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. आर्थिक नियोजन होऊ शकेल.
  • वृषभ (TAURUS) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्यानं आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही.
  • मिथुन (GEMINI) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. कामे होतील. उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरणात बदल होईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
  • कर्क (CANCER) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजची सकाळ कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, काही ना काही कारणाने मन चिंतीत होईल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. हाती असलेली कामे पूर्ण होऊ शकणार नाहीत. खर्चात वाढ होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
  • सिंह (LEO) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. एखाद्या स्त्रीमुळं लाभ होतील. संततीकडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. एखादा प्रवास संभवतो. वैवाहिक सौख्य लाभेल.
  • कन्या (VIRGO) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. प्रलंबित कामे पूर्णत्वास नेऊ शकाल. व्यापार वृद्धी होईल. कौटुंबिक जीवनात जिव्हाळा वाढेल. सामाजिक मान-सन्मान होतील.
  • तूळ (LIBRA) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल. परदेशस्थ नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. नवीन कार्य हाती घेऊ शकाल.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील. प्रवासात अडचणी येतील. आध्यात्म आणि ईश्वरभक्ती ह्यामुळं आपणास मदत होईल.
  • धनू (SAGITTARIUS) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते. परदेशस्थ नातेवाईकांकडून काही आनंददायी बातम्या येतील.
  • मकर (CAPRICORN) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो. स्त्रियांना माहेरकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
  • कुंभ (AQUARIUS) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या स्थानी असेल. आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल. प्रकुतीची काळजी घ्यावी लागेल.
  • मीन (PISCES) : आज वृषभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद आणि उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडं जास्त लक्ष देऊ शकाल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात मोठे यश लाभेल.

हेही वाचा -

  1. पितरांची तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला 'या' पितरांचं करा श्राद्ध; जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ - Sarvapitri Amavasya 2024
  2. पितृपक्षात 'या' वेळेत करा श्राद्ध विधी; पितृदोषापासून मिळेल मुक्ती - Pitru Paksha 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.