ETV Bharat / spiritual

वृषभ, तूळ, मीन राशींच्या नात्यात येईल गोडवा; वाचा राशी भविष्य - Horoscope 26 July 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 4:52 AM IST

Horoscope 26 July 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)
  • मेष (ARIES) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस अत्यंत सावधपणे घालवा. सर्दी, खोकला, ताप यामुळं प्रकृती बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. मांगलिक व सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल.
  • वृषभ (TAURUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपली प्राप्ती आणि व्यापार ह्यात वाढ होईल. व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढतील. कुटुंबीय व मित्रांसह हसण्या-खेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रवास-पर्यटनाचे योग आहेत. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होतील. वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढेल. भावंडे आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होतील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
  • मिथुन (GEMINI) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. शरीर आणि मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्यानं कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामे सुद्धा सहजतेने पूर्ण होतील.
  • कर्क (CANCER) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. नोकरदारांना लाभ होईल.
  • सिंह (LEO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडं अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणं-पिणं टाळा. आजारामुळं खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. काळजी कमी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
  • कन्या (VIRGO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.
  • तूळ (LIBRA) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील.
  • वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचं, आनंदाचं वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल व खोळंबलेली कामे मार्गी लागतील.
  • धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपणात शारीरिक, मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्यानं मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते. नदी, तलाव, समुद्र अशा जलाशयांपासून सांभाळून राहा.
  • मकर (CAPRICORN) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. मित्र व आप्त यांच्या भेटीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
  • कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळं निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळं विपरीत परिणाम होईल. प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद-विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील.
  • मीन (PISCES) : आज चंद्र मीन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. कुटुंबात शांततेचं वातावरण पसरेल.

हेही वाचा -

'या' राशींच्या लोकांनी राहावे सावध, सर्तकतेने करा काम; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.