ETV Bharat / spiritual

12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस ? वाचा राशीभविष्य - राशीभविष्य 2024

Today Horoscope : कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 20 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ....

Today Horoscope
राशीभविष्य 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 11:35 AM IST

Updated : Feb 20, 2024, 6:12 AM IST

  • मेष : आज चंद्र मिथुन राशीत आहे. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये.
  • वृषभ : आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळं हाती आलेल्या संधीला मुकावं लागेल. फसव्या व्यवहारामुळं संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत यांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आजचा दिवस नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी अनुकूल नाही.
  • मिथुन : आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र आणि नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल आणि त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळं दिवस खूप आनंदात जाईल. एखादा प्रवास ठरवण्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.
  • कर्क : आज आपणास भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्यानं कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. आज बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडं लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज आणि मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
  • सिंह : आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभापासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडं लक्ष द्यावं. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग आणि थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.
  • कन्या : आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.
  • तूळ : आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती आणि स्वास्थ्य या संबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. पैसा खर्च होईल.
  • वृश्चिक : आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहावे. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
  • धनू : आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळं आजचा दिवस आनंदात जाईल. भागीदारीत फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराशी संबंध दृढ होतील. मान - सन्मान वाढेल.
  • मकर : आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती आणि यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचं चांगलं सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे.
  • कुंभ : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्यानं कोणताही महत्वाचा निर्णय न घेणं हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्यानं खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास यांची चिंता लागून राहील.
  • मीन : आज उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट - कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळं त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशया पासून दूर राहा.

हेही वाचा -

  1. Weekly Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
  2. आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशीसाठी आहे लाभदायक; वाचा राशीभविष्य
  3. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

Last Updated : Feb 20, 2024, 6:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.