- मेष (ARIES) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. वस्त्रालंकार लाभतील.
- वृषभ (TAURUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी, व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
- मिथुन (GEMINI) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्तीविषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचा सहवास घडल्यानं आपणास आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल.
- कर्क (CANCER) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर काही ना काही कारणाने चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.
- सिंह (LEO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्यानं इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपार नंतर आप्तेष्टांकडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. संबंधातील प्रेमळपणामुळं आपला स्वभाव मृदु होईल.
- कन्या (VIRGO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ आणि लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.
- तूळ (LIBRA) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळं मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट - कचेरीपासून शक्यतो दूर राहणं हितावह राहील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या वक्तृत्वाने इतरांची मने जिंकाल.
- वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याचबरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपारनंतर मात्र, शारीरिक, मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी वाद संभवतो. स्वभावात तापटपणा वाढेल.
- धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश आणि कीर्ती लाभेल. व्यापारात व प्राप्तीत वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल.
- मकर (CAPRICORN) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामासंबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल.
- कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपण जर आपल्या रागावर आणि वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपार नंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल.
- मीन (PISCES) : आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपारनंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून शक्यतो दूर राहावे.
हेही वाचा -
कसा असेल तुमच्यासाठी येणारा आठवडा? वाचा साप्ताहिक राशी भविष्य - Weekly Horoscope