ETV Bharat / spiritual

धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्यामागं काय कारण? 'या' गोष्टींची करा खरेदी, जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त - DIWALI 2024

धनत्रयोदशीला धन-समृद्धीसाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.

Dhantrayodashi 2024
धनत्रयोदशी 2024 (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2024, 7:35 PM IST

हैदराबाद : कार्तिक कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशीचा सण (Dhanteras) साजरा केला जातो. यंदा धनत्रयोदशी मंगळवार, 29 ऑक्टोबरला आहे. असं मानलं जातं की, या दिवशी समुद्रमंथनातून अमृताचं भांड बाहेर पडलं आणि देवांचे वैद्य धन्वंतरी हे अमृत पात्र घेऊन प्रकट झाले. त्यामुळं आरोग्यासाठी या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. तसेच हा दिवस कुबेराचाही दिवस मानला जातो. या दिवशी धन-समृद्धीसाठी कुबेर देवाची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.

धनत्रयोदशी खरेदीचा मुहूर्त : यंदा धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग तयार होत आहे. मंगळवार 29 ऑक्टोबरला पहिला मुहूर्त सकाळी 6 वाजून 31 मिनिटांपासून ते 10 वाजून 31 मिनिटांपर्यंत आहे. तर दुसरा मुहूर्त हा दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून ते 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. तसेच संध्याकाळच्या मुहूर्तावर ही खरेदी करू शकता. संध्याकाळचा मुहूर्त हा 5 वाजून 38 मिनिटांपासून के 6 वाजून 04 मिनिटांपर्यंत आहे.

पूजेचा मुहूर्त : धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा संध्याकाळी केली जाते. सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटं ते 8 वाजून 31 मिनिटं या वेळेत पूजा करता येईल. याचा अर्थ धनत्रयोदशीच्या पूजेसाठी तुम्हाला 1 तास 42 मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळेल.

धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' गोष्टींची करा खरेदी : तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, लक्ष्मी किंवा गणपतीची मूर्ती खरेदी करणं शुभ मानलं जातं. तसेच तांबा, पितळ, चांदीची भांडी विकत घेणंही शुभ आहे.

झाडूची पूजा : हिंदू धर्मात धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची फार पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. झाडूला संपत्ती, समृद्धी व लक्ष्मीचे रूप मानले जाते. असं मानलं जातं की, झाडू हे घरातील दारिद्र्य, वाईट आणि नकारात्मकता गोष्टी काढून टाकण्याचं प्रतीक आहे. या दिवशी झाडू खरेदी केल्यानं घरात सुख-शांती येते आणि संपत्ती वाढते. त्याशिवाय घरातून गरिबीही दूर होते.

धनत्रयोदशीला 'या' गोष्टींची काळजी घ्या : या दिवशी कुबेर आणि धन्वंतरी यांची एकत्र पूजा करा. आजच्या दिवशी फक्त सोने, चांदी, पितळ किंवा स्टील खरेदी करा. धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंड किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करणं टाळा. तसेच यादिवशी गरजूंना दान करणं फायदेशीर ठरेल.

धनत्रयोदशीला दिव्याचे दान : धनत्रयोदशीच्या दिवशी यमासाठी पिठाचा चारमुखी दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवला जातो. दिवा लावून आणि दक्षिणेकडं तोंड करून यमाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान यमाची पूजा केल्यानं अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते, असं मानलं जातं.

टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.

हेही वाचा -

  1. यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
  2. धनत्रयोदशीला करा हे तीन कार्य; घरात नांदेल सुख-समृद्धी
  3. लक्ष्मीपूजन केव्हा करावं? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या योग्य तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.