हैदराबाद Anant Chaturdashi 2024 : हिंदू धर्मात अनंत चतुर्दशी व्रताला खूप महत्त्व आहे. या उत्सवाला अनंत चौदास असंही म्हणतात. अनंत चतुर्दशी हा सण भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी उपवास करून भगवान विष्णूच्या अनंत रुपाची पूजा केली जाते. यासोबतच या दिवशी गणेशोत्सवाचीही (Ganeshotsav 2024 ) सांगता होते. यावर्षी अनंत चतुर्दशीचा सण 17 सप्टेंबर 2024 रोजी मंगळवारी आहे. अशा परिस्थितीत यावर्षी गणपती विसर्जनाचा शुभ (Ganpati Visarjan Shubh Muhurat) मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात.
अनंत चर्तुदशी शुभ मुहूर्त (Anant Chaturdashi) : हिंदू कॅलेंडरनुसार, यावेळी अनंत चर्तुदशीचा शुभ मुहूर्त हा 16 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुरु होईल तर 17 सप्टेंबरला सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी संपेल. परंतु उदयतिथीनुसार यावर्षी गणेश विसर्जन मंगळवारी, 17 सप्टेंबर 2024 रोजी आहे.
गणेश विसर्जन आणि पूजा विधी : गणेश विसर्जनाच्या आधी शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची विधीवत पूजा करावी. श्री गणेशाच्या मूर्तीचे तोंड हे नेहमी समोर असायला हवे. पूजा झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करावा. तसेच बाप्पाची मनोभावे आरती करुन प्रार्थना करावी. गणेशमूर्तीसोबत फळे, फुले, कपडे आणि मोदक ठेवा. तांदूळ, गहू आणि पंचमेवा ठेवा. त्यात काही नाणी टाका. त्यानंतर पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणेश मूर्तीचं विसर्जन करून बाप्पाला निरोप द्यावा. गणपतीचं विसर्जन करताना पूजा साहित्य आणि निर्माल्याचे देखील विसर्जन करायला हवे. विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.
अनंताचा धागा ठेवून करा भगवान विष्णूंची पूजा : अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची अनंत या नावे पूजा केली जाते. पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो. तर अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा, ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळं प्रत्येक कामात यश मिळतं. अनंत चतुर्दशीला बांधलेला 14 गाठीचा धागा हा 14 लोकांचं प्रतिनिधित्व करतो.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेल असं नाही.
हेही वाचा -
- गणेश विसर्जन सुरक्षेसाठी मुंबई पोलीस सज्ज, वाचा लालबागच्या राजाची दर्शनरांग कधी होणार बंद - Ganesh immersion security
- 'या' राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा; नवीन संधीचे द्वारे उघडणारा, वाचा साप्ताहिक राशीभविष्य - Weekly Horoscope
- राजर्षी शाहूंचा कृतिशील वारसा, गेली 55 वर्ष कोल्हापुरातील 'या' मंडळाच्या अध्यक्षपदाचा मान मुस्लिम कुटुंबाकडे - Shahu mandal story