मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईमधील सहा लोकसभा मतदारसंघापैकी काही मतदारसंघाचा तिढा गेले काही दिवस महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये दिसत होता. त्यापैकीच एक असलेल्या मुंबई उत्तर मध्य लोकसभेसाठी (Mumbai North Central Lok Sabha) आता काँग्रेसने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात 'या' नावाची चर्चा : महाविकास आघाडीच्या जागांच्या वाटपात मुंबईत उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसला दोन जागा मिळाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी काँग्रेस सक्षम उमेदवारांच्या शोधात होती. यामध्ये उत्तर मध्यचे काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा होती, मात्र काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्या नावाला मंजुरी दिली. काँग्रेस उत्तर मुंबईच्या जागेसाठी उमेदवार शोधत आहे.
काँग्रेस विरूध भाजपा होणार लढत : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. ज्यामध्ये विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि कलिना यांचा समावेश आहे. त्यापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. वांद्रे पूर्वचे आमदार काँग्रेस पक्षातून जवळपास बाहेर पडले आहेत. कलिना विधानसभा मतदारसंघात संजय पोतनीस हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. अशा स्थितीत या जागेवर भाजपाच्या उमेदवारा विरोधात वर्षा गायकवाड यांना कसरत करावी लागणार आहे. उत्तर मध्य मुंबईतून भाजपाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. येथून आशिष शेलार, अमित साटम, खासदार पूनम महाजन यांच्या नावांची चर्चा आहे.
वर्षा गायकवाड होत्या नाराज : महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला अपेक्षित असलेले मतदारसंघ न मिळाल्यानं वर्षा गायकवाड नाराज होत्या. याबाबतची नाराजी त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांच्या कानावरही घातली होती. त्यामुळं पुन्हा एकदा मुंबई काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस असा वाद पाहायला मिळाला होता.
हेही वाचा -
- अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे, विरोधकांची टीका; तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा - Amravati Lok Sabha Constituency
- देशातील महिलांच्या मंगळसूत्रावर गंडांतर मोदींमुळंच; संजय राऊत यांची पंतप्रधानांवर टीका - Sanjay Raut On PM Narendra Modi
- अग्नीवीरसह कंत्राटी नोकर भरती रद्द करणार...राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं जाहीरनाम्यात काय दिली आहेत आश्वासनं? - NCP SCP releases manifesto