ETV Bharat / politics

उद्धव ठाकरे लवकरच मोदींसोबत असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ; रवी राणा यांच्या दावा - Lok Sabha Election Results 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 10:31 PM IST

Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मोठं विधान केलंय.

Lok Sabha Election Results 2024
नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे (ETV BHARAT HM DESK)

अमरावती Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा एकदा बहुमतानं नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे विजयी होणार असून देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ते घेतील. नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचारात सतत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्तुती केलीय. नरेंद्र मोदी यांनी आपली एक खिडकी कायम उद्धव ठाकरे यांच्यासाठी उघडी असल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर उद्धव ठाकरे हे देखील देश हितासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत लवकरच उभे दिसतील, असा विश्वास बडनेराचे आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी व्यक्त केलाय.

प्रतिक्रिया देताना आमदार रवी राणा (ETV BHARAT Reporter)

संजय राऊत चूप बसणार : संजय राऊत यांनी सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. संजय राऊत आपल्या पद्धतीनं आपलं राजकारण करतात. त्यांनी आजवर केलेली भविष्यवाणी ही सपशेल फोल ठरली आहे. उद्धव ठाकरे आता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणार असल्यामुळं संजय राऊत देखील चूप बसणार असं आमदार रवी राणा यांनी म्हटलंय.

नवनीत राणांचा विजय निश्चित : अमरावती मतदारसंघात खासदार म्हणून नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्राच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न केले आहेत. लोकांसोबत सहभागी होऊन नवनीत राणा यांनी आपल्या मतदारसंघात काम केली आहेत. जिल्ह्यातील महिला युवक वृद्ध आणि संपूर्ण बहुजन समाज हा पूर्ण ताकदीनिशी नवनीत राणा यांच्या पाठीशी उभा होता. त्यामुळं नवनीत राणा यांचा विजय हा निश्चित असल्याचा विश्वास देखील आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला. नवनीत राणा या दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील. महाविकास आघाडीचे अनेक नेत्यांनी देखील नवनीत राणा यांना बळ दिले असा खुलासा आमदार रवी राणा यांनी केला.

यशोमती ठाकूर यांच्यावर कारवाई करा : उद्या सिव्हील वार होणार असं म्हटलं जात आहे. मात्र काँग्रेसच्या मंडळींनी निवडणूक काळात नवनीत राणा यांच्यावर अनेक आरोप केलेत माझ्याबाबत देखील चुकीचं वक्तव्य केलं. जर उद्याच्या निकालानंतर सिविल वार होत असेल तर पोलीस नक्कीच दक्षता बाळगतील. पोलिसांनी सिविल वार संदर्भात यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला अतिशय गांभीर्यानं घेण्याची गरज असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी असं देखील आमदार रवी राणा म्हणाले.

हेही वाचा -

  1. अमरावतीत 'जंग ऐ मैदान'; अमित शाहांच्या सभेवरुन बच्चू कडू आक्रमक; भाजपावर हल्लाबोल
  2. 'त्या' प्रश्नावरून नवनीत राणा म्हणाल्या, " नवरा बायकोमध्ये भांडण लावू नका"
  3. नवनीत राणांनी घेतले केंद्रीय गृहमंत्र्यांचे आशीर्वाद; म्हणाल्या, "भाजपा कार्यकर्ता..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.