ETV Bharat / politics

"मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय"- सुप्रिया सुळे - SUPRIYA SULE pune news

Supriya Sule News : पुण्यातील वीज दरवाढीविरोधात महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) आज (4 एप्रिल) आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद असताना शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं.

Supriya Sule says I booked Ravindra Dhangekar ticket to Delhi
शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 4:04 PM IST

शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे

पुणे Supriya Sule News : वीज दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील महावितरण कार्यालयाबाहेर महाविकास आघाडीच्या (MVA) वतीनं आंदोलन करण्यात आलं. शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात पुणे लोकसभेसाठीचे महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी सहभागी झाले होते.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पुण्यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व उमेदवार बहुमतानं विजय होतील. आम्ही जेव्हा जिल्ह्यात फिरतो तेव्हा नागरिक महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराला कंटाळले असल्याचं बघायला मिळतं. लोकांना केंद्रामध्ये बदल हवा आहे, त्यामुळं आगामी निवडणुकीमध्ये नागरिक या सरकारला नक्कीच धडा शिकवतील", असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसंच मी रविंद्र धंगेकरांचं दिल्लीला जायचं तिकीट बुक करून ठेवलंय, असंही त्या म्हणाल्या.

वीज दरवाढीविषयी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे : पुढं वीज दरवाढीसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे. उन्हाळा वाढत असून अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना सरकारनं केलेली दरवाढ ही हुकूमशाही आहे. मात्र, हे आम्ही सहन करणार नाही", असं त्या म्हणाल्या.

फडणवीसांच्या सभेवरही दिली प्रतिक्रिया : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या इंदापूर येथे सभा होणार आहे. याविषयी विचारण्यात आलं असता सुळे म्हणाल्या, "लोकशाही असून प्रत्येकाला आपल्या आघाडीत काय करायचंय हा त्याचा अधिकार आहे. माझ्या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर बनला आहे. आज अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणून मी माझ्या मतदारसंघात जास्त लक्ष देत आहे."

हेही वाचा -

  1. Vanchit Support Supriya Sule : वंचितचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा; सुळेंनी मानले आभार - Lok Sabha Elections
  2. वंचित बहुजन आघाडीचा सुप्रिया सुळे यांना पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका दुटप्पी? काय म्हणाले राजकीय विश्लेषक? - Vanchit Aaghadi
  3. केवळ शरद पवार यांना संपवण्यासाठी षडयंत्र; सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप - Lok Sabha Elections

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.