ETV Bharat / politics

ठाकरे गटाचा EVM च्या सुरक्षेवर भरोसा नाय का? ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा' - lok sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत मतदान झाल्यानंतर मतपेट्यांमध्ये फेरफार होवू नये यासाठी ठाकरे गटाचे स्ट्रॉंग रुम बाहेर कार्यकर्ते जागता पहारा देताना दिसत आहेत.

ठाकरे गटाचा स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेवर भरोसा नाय का? ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा'
ठाकरे गटाचा स्ट्रॉंग रुमच्या सुरक्षेवर भरोसा नाय का? ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा' (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:23 PM IST

ठाणे Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर मतपेट्या स्ट्रॉंग रुममध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांना या सुरक्षा व्यवस्थेवर भरोसा नसल्यामुळं स्ट्रॉंग रुम बाहेर कार्यकर्ते जागता पहारा देत असल्याचं दिसतंय.

ठाण्यात स्ट्रॉंग रुमबाहेर कार्यकर्त्यांचा 'खडा पहारा' (ETV Bharat Reporter)

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून खडा पहारा : महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी स्ट्रॉंग रूम बाबत केलेल्या वक्तव्यामुळं स्ट्रॉंग रुमबाबत संशय निर्माण झालेला आहे. यामुळं मतपेट्यांमध्ये फेरफार होवू नये यासाठी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देवून स्ट्रॉंग रुममधील सीसीटीव्ही फुटेज प्रक्षेपण सर्वांना पाहता आलं पाहिजे अशी व्यवस्था करण्याची मागणी केली आणि ही त्यांची मागणी मंजूर देखील करण्यात आलेली आहे. आता हे फुटेज पाहण्याचं काम ठाकरे गटाचे कार्यकर्ते अहोरात्र करत आहेत.

कार्यकर्ते 24 तास लक्ष ठेवून : 4 जुन रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तोपर्यंत ठाण्याच्या जागेवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. तसंच बारामती, कोल्हापूर, सातारा या जागांवर देखील सर्वांचं लक्ष लागून आहे. लाईट जाणं आणि कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी चोख बंदोबस्त असूनही ठाकरे गटाला मात्र संशय आहे. मतपेट्या ठेवलेल्या जागी कोणताही अनुचित प्रकार आणि मतपेट्यांशी छेडछाड होवू नये म्हणून चोवीस तास कार्यकर्ते या स्ट्रॉंग रुमवर लक्ष ठेवत आहेत.

जिल्हा प्रशासनानं केली व्यवस्था : एकूणच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील आरोप प्रत्यारोप लक्षात घेवून जिल्हा प्रशासनानं ठाण्यातील स्ट्राँग रुम बाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधी साठी बसण्याची आणि लक्ष ठेवण्यासाठी व्यवस्था केलीय. जिथं सीसीटिव्ही प्रक्षेपण दिसत असून इथं चोख बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

  1. लोकसभेचा अचूक अंदाज सांगा आणि बक्षीस मिळवा; पुण्यातील अनोख्या स्पर्धेची सर्वत्र चर्चा - lok sabha election 2024
  2. ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड? लंकेनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Nilesh Lanke On EVM Machines
  3. मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.