ETV Bharat / politics

जागावाटपावरून शिवसेनेत कुरबुर; पाच जागांवर एक-दोन दिवसात तोडगा निघेल-संजय शिरसाट - Shivsena Meeting - SHIVSENA MEETING

Shivsena Meeting : महायुतीतील जागावाटपावरुन शिवसेनेतील आमदार आणि खासदार नाराज असल्याचं दिसतंय. शनिवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांच्या नाराजीचा सूर उमटला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 12:55 PM IST

Updated : Apr 7, 2024, 1:07 PM IST

शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट

मुबंई Shivsena Meeting : लोकसभा निवडणुकीचं वातावरणाच्या तापायला सुरुवात झालीय. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील जागा वाटपावरील नाराजी थांबायचं नाव घेत नाही. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत मंत्री आणि आमदारांनी महायुतीतील घटक पक्षांबाबत नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आलीय. महायुतीमधील अंतर्गत कलह टाळून एकोप्यानं कामाला लागा, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ही माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली.

अनेक विषयांवर चर्चा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलविलेल्या बैठकीला शिवसेना पक्षाचे मंत्री, प्रमुख नेते, कोअर कमिटीतील सदस्य आणि आमदार उपस्थित होते. कोणते मतदारसंघ शिवसेनेकडे असावेत? उद्या तेथील परिस्थिती काय असेल? याबाबत आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी चर्चा केली. काही मतदारसंघात महायुतीतील इतर पक्ष दावा करत आहेत. त्या मतदारसंघावर आग्रही भूमिका पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडण्यात आली. आपण जो आदेश द्याल त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे कोअर कमिटी सदस्य आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी आश्वासन दिले.

वेगळी विंग तयार : "लोकसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जात असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या तीनही पक्षांना स्थानिक स्तरावरील ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत समन्वय ठेवायचा आहे. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या उद्देशानं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याबाबतच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत," असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितलंय. महायुतीतील लोकसभेच्या उमेदवाराबाबत मतदार संघात समन्वय साधण्यासाठी वेगळ्या प्रकारची विंग तयार करण्यात आलीय. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या विभागनिहाय विंग तयार करण्यात आल्याची यावेळी शिरसाट यांनी माहिती दिली.

महातुतीत तणाव निर्माण होईल, असे वक्तव्य करू नये : महायुतीतील इतर मित्रपक्ष युतीचा धर्म पाळत नसल्यानं बैठकीत मंत्र्यांनी आमदारांनी नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, "काही प्रमाणात कुरबुरी आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक होईल. या बैठकीत सूचना आणि तक्रारी यावर सविस्तर चर्चा होईल, असं पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. तसंच यापुढं कोणीही एकामेकांविरोधात बोलणार नाही, याची काळजी घ्या, अशा प्रकारच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. विद्यमान खासदारांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नाही. त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले. तसंच लवकरच शिवसेनेच्या सर्व आमदारांची आणि जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलवण्यात येणार आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघासाठी शिवसेनेतील मंत्री आणि आमदार आग्रही आहेत. याविषयीचा तोडगा येत्या एक-दोन दिवसात निघेल," असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

आपल्या हक्काच्या जागा देऊ नये असा बैठकीत सूर? : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मंत्री आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील जागा वाटपावरून नाराजी व्यक्त केली. महायुतीमधील इतर घटक पक्ष युतीचा धर्म पाळत नसल्याबाबतदेखील चर्चा झाली असल्याचं बोललं जातंय. आपण केल्या उठावामुळं आपल्या मित्र पक्षाला सत्तेत बसता आलंय. रायगड आणि धाराशिव हे मतदार संघ मित्र पक्षांना दिलं. त्यामुळं नाशिक, रत्नागिरी, ठाणे, संभाजीनगर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे लोकसभा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावेत, अशा प्रकारचा सूर बैठकीत आळविला गेल्याची माहिती समोर आलीय.

हेही वाचा :

  1. भिवंडीत महायुतीत फूट? शिवसेनेचं खच्चीकरण करणारे भाजपाचे उमेदवार नको! - Bhiwandi Lok Sabha Constituency
  2. "फडणवीसांनी एकदाही अजित पवारांचा उल्लेख...", अमोल कोल्हे यांची जोरदार टोलेबाजी - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 7, 2024, 1:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.