ETV Bharat / politics

अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024 - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात लोकसभेत कॉंग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सर्वेचा अंदाज फोल ठरवत मोठ्या प्रमाणात यश मिळवलंय. यामुळं आगामी विधानसभा जागावाटपाच्या वेळी या दोघांचीही बार्गेनिंग पॉवर वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 8:02 PM IST

मुंबई Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता देशात कोणाचं सरकार येणार याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय. मात्र, महाराष्ट्राचा विचार केला तर महायुतीनं 40 प्लसचा नारा दिला होता. मात्र त्यांना 17 जागांवर समाधान मानावं लागलंय. तर दुसरीकडे शिंदे गट आणि काँग्रेस यांना सिंगल डिजिटमध्ये जागा मिळतील, असे सर्वाचे अंदाज होते. सर्वेच्या माध्यमातून असे आकडे समोर आले होते. मात्र सर्वेचा अंदाज फोल ठरवत काँग्रेसनं 13 जागा मिळवत एक नंबरचा पक्ष राज्यात ठरला आहे. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनंही 15 पैकी सात जागा मिळाल्यानं त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून, 47 टक्के स्ट्राईक रेट राहिलाय. दरम्यान, काँग्रेस आणि शिंदेंना अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं विधानसभा जागावाटपाच्या वेळी या दोघांचीही बार्गेनिंग पॉवर वाढेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काँग्रेस-शिंदे गट वरचढ : लोकसभा निवडणुकीपुर्वी महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कित्येक दिवस आधी ठरलं असताना, दुसरीकडे जागावाटपासह उमेदवारीवरी जाहीर करण्यास महायुतीला बराच विलंब लागला. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर एक-दोन दिवस अगोदरच उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. शिंदे गटाला तर उमेदवार सुद्धा मिळत नव्हते. एक-दोन जाहीर केलेले उमेदवार शिंदे गटाला बदलण्यास भाजपानं भाग पाडलं किंवा भाजपानं त्यांच्यावर दबाव आणला, असं असताना पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक शिंदे गटाकडून लढवली जात होती. त्यामुळं शिंदे गटाला चार ते पाच जागा मिळतील असा अंदाज लावण्यात येत होता. सर्वेमधूनही असंच आकडे दाखवले जात होते. मात्र सर्वांचे अंदाज खोटं ठरवत शिंदे गटानं सात जागा मिळवल्या त्यांचा स्ट्राइक रेट 47 टक्के राहिला. यामुळं त्यांची ताकद वाढली असून, विधानसभेत शिंदे गटाकडून अधिक जागा मागण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे काँग्रेस पक्षाची राज्यातील वाताहात आणि पक्षाला लागलेली घरघर तसंच अनेक दिग्गज नेते सोडून गेल्यामुळं पक्षाची ताकद कमी झाली होती. सर्वेच्या माध्यमातूनही 7-8 जागा काँग्रेस पक्षाला मिळतील, असं म्हटलं जात होतं. मात्र हे अंदाज चुकीचे ठरवत काँग्रेसनं 13 जागा मिळवल्या आणि राज्यात एक नंबरचा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला. परिणामी महाविकास आघाडीत विधानसभेसाठी सर्वाधिक जागांची मागणी काँग्रेस पक्षाकडून होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जागा शाबूत राखण्याचं आव्हान : लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यामुळं विधानसभेसाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असा प्रश्न राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना विचारला असता ते म्हणाले की, "या दोघांचीही बार्गेनिंग पावर वाढू शकते तसंच ते अधिक जागांची मागणी नक्कीच करु शकतात. मात्र, शिंदे गटासमोर जे आपल्यासोबत 40 आमदार आलेले आहेत. त्यांना त्या जागेवर उमेदवारी मिळवून देणं आणि त्या आमदारांना निवडून आणणं हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर पहिलं आव्हान आहे." तसंच हेच आव्हान अजित पवार गटासमोर देखील आहे, कारण अजित पवार गटाला अपेक्षित यश न मिळाल्यामुळं त्यांच्यासोबत जे आमदार आले आहेत. त्यांना विधानसभेत उमेदवारी मिळवून देणं हे आव्हान अजित पवारांसमोर आहे. मात्र आगामी काळात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढेल. कारण काँग्रेस पक्षाला मागील काही दिवसांपासून राज्यात अपेक्षित यश मिळत नव्हतं. मात्र आता एक नंबरच्या जागा मिळाल्यामुळं ते नक्कीच अधिक जगाची मागणी करु शकतात, असंही राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी म्हटलंय.

होय आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल - शिवसेना : लोकसभा निवडणुकीत आम्हाला पंधरापैकी सात जागा मिळाल्या आहेत. आमचा स्ट्राइक रेट 47 टक्के इतका राहिलाय. त्यामुळं विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल, असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी म्हटलंय. तसंच जे आमच्यासोबत 40 आमदार आहेत, त्यांची उमेदवारी सुद्धा आम्हाला मिळेल आणि ते आमदार देखील निवडून येतील. याशिवाय आम्ही अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करु, असंही शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी म्हटलंय. तर दुसरीकडं राज्यात आम्हाला अधिक जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे म्हणून आम्ही आमची बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा आम्ही अधिक जागांची मागणी करु हे आत्ताच सांगणं कठीण आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा अवधी आहे. त्यावेळी महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून यावर तोडगा काढतील आणि कोणाला किती जागा द्यायच्या किंवा आम्हाला किती जागा द्यायच्या हा त्याचवेळी निर्णय घेण्यात येईल. मात्र आमची नक्कीच ताकद वाढलीय, असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. 'गड आला पण सिंह गेला'; ठाण्यात ठाकरे गटाकडून पोस्टरबाजी तर शिंदे गटाकडूनही प्रत्युत्तराचे बॅनर - Lok Sabha Election Result
  2. महायुतीमधील शिवसेनेसह राष्ट्रवादीचं वाढलं महत्त्व, केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी? - NDA gov formation
  3. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या दोन बैठकीत काय होणार चर्चा? - NCP Meetings Inside story

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.