मुंबई Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून आतापासूनच रणनीती आखली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात 113 विधानसभा मतदारसंघासाठी 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरिक्षकांच्या अधिकृतरित्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या अधिकृत पत्रकावरून ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
कोण आहेत प्रभारी? :शिवसेनेच्या 46 विधानसभा प्रभारीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत रघुवंशी, मंत्री दादाजी भुसे, राजेंद्र चौधरी, हेमंत गोडसे, सुहास कांदे, कमलेश राय, खासदार मिलिंद देवरा, यशवंत जाधव, खासदार रवींद्र वायकर, राहुल शेवाळे, शिशिर शिंदे, माजी खासदार संजय निरुपम, मंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर, मंत्री तानाजी सावंत आदींचा समावेश करण्यात आला आहे.
कोण आहेत निरिक्षक? : तर दुसरीकडं 93 विधानसभा निरिक्षक यांच्या देखील अधिकृतरित्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये किशोर दराडे, साक्री, चोपडा, प्रसाद ढोमसे, प्रवक्ते राजू वाघमारे, विजय करंजकर, किरण लांडगे, फरहान खान, तृष्णा विश्वासराव, कृष्णा हेगडे, संजीव भोर, सुशांत शेलार आदी एकूण 93 विधानसभा निरिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -
- महायुतीला का हवेत राज ठाकरे? 'मनसे'च्या इंजिनला स्पीड आलाय की महायुतीत घोळ झालाय? - MNS Mahayuti Assembly Elections
- "अमित शाह यांना तडीपार करण्याचं कारस्थान..."; शरद पवारांच्या टीकेला पीयूष गोयल यांचं प्रत्युत्तर - Piyush Goyal
- देवेंद्र फडणवीस पावसाळ्यात उगवलेली छत्री; संजय राऊतांचा हल्लाबोल, राणे म्हणाले, राऊत पावसाळ्यातील.... - Sanjay Raut