ETV Bharat / politics

"दाढीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम करणार"; विधानसभेसाठी भाजपा आमदाराला सख्ख्या भावाचं आव्हान - Shekhar Gore Vs Jaykumar Gore

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 10:08 PM IST

Shekhar Gore Vs Jaykumar Gore : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांनी दंडही थोपटायला सुरूवात केलीय. याच पार्श्वभूमीवर माण-खटावमधून इच्छूक असणाऱ्या शेखर गोरेंनी आपले सख्खे बधू आणि भाजपाचे आमदार जयकुमार गोरेंचा यंदाच्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे दिलाय.

Jaykumar Gore and laxman gore
भाजपा आमदार जयकुमार गोरे-शेखर गोरे (File Photo)

सातारा Shekhar Gore Vs Jaykumar Gore : लोकसभा निवडणुकीत आवाहन केल्यानंतर मतदारांनी फलटणच्या मिशीवाल्याला पाडलं. त्याचप्रमाणं माणच्या दाढीवाल्याचा कार्यक्रम लावलाय. जनतेच्या आशीर्वादावर येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा, उबाठा गटाचे नेते, जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी आपले सख्खे बंधू आणि भाजपा आमदार जयकुमार गोरे यांना दिलाय.

आमदारांची दहशत संपवणार : शेखर गोरेंनी मंगळवारी एक पत्रक प्रसिध्दीस दिलं आहे. त्यामध्ये त्यांनी जयकुमार गोरेंचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचं म्हटलंय. माण-खटाव विधानसभा मतदारसंघात जयकुमार गोरेंनी चालवलेली दहशत आणि हुकुमशाही संपविण्याची सुपारी मी जनतेच्यावतीनं घेतली आहे. लोकप्रतिनीधीने मतदारसंघाचा ठेका घेतल्यासारखं वागू नये, असा इशाराही शेखर गोरेंनी पत्रकात दिला आहे.

गोरेंची उमेदवारी राहतेय का : लोकशाहीत कोणी गाठीभेटी सुरू करेल. कार्यक्रमांना उपस्थित राहील. निवडणूक लढवेल. हे सगळं प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या मर्जीनं करेल. माण-खटाव विधानसभा कोण लढवणार ते महाविकास आघाडी आणि आमचं आम्ही बघू. परंतु, भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीच्या सर्व्हेत जयकुमार गोरेंचीच उमेदवारी राहतेय की नाही, याची शंका आहे. आधी महायुतीची उमेदवारी मिळतेय का ते बघा, असा टोला शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंना लगावला आहे.

निवडणुकीत किंगमेकरला जागा दाखवली : किंगमेकर व्हायची हौस असलेल्यांना जनतेने माढा लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली आहे. पैसे वाटून मतदारसंघात मिळवलेल्या मताधिक्यावर उड्या मारू नका, असा खोचक सल्ला शेखर गोरेंनी पत्रकातून दिला आहे. जयकुमार गोरेंच्या हट्टापोटी आणि हुकुमशाहीमुळं हक्काचा लोकसभा मतदारसंघ भाजपाच्च्या हातातून गेला. लोकसभा निवडणुकीत विजय आमचाच होणार, अशा बोंबा मारणारे महाविकास आघाडीने तगडा उमेदवार देताच पाय लावून का पळत होते. या निवडणुकीत तुमचाही कार्यक्रम होणारच, हे लक्षात ठेवा, असा इशाराच शेखर गोरेंनी आमदार जयकुमार गोरेंना दिला आहे.

हेही वाचा -

विधान परिषद निवडणुकीत मविआला आणि महायुतीला मिळणार किती जागा? - Vidhan Parishad Election

मुंबईत मराठी लोकांना ५० टक्के आरक्षित घरं, हे ठाकरेंना सुचलेलं उशिराचं शहाणपण; आशिष शेलार यांचा अनिल परब यांना टोला - Ashish Shelar Criticism Anil Parab

इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखेंनी उडवली खिल्ली; शरद पवारांच्या 'या' पठ्ठ्यानं इंग्रजीत घेतली 'खासदारकी'ची शपथ - Nilesh Lanke Oath In English

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.