पुणे Sharad Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. सोमवारपासून नवीन सरकारचं अधिवेशन होणार आहे. लोकसभेच्या उपसभापतीबाबत (Deputy Speaker) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "जनरली हे पद विरोधी पक्षाला दिलं जातं. मात्र, गेल्या 10 वर्षांपासून मोदींनी ही परंपरा पाळली नाही. त्यामुळं आम्हाला याबाबत आता अपेक्षा नाही."
सोमवारी लोकसभेचं अधिवेशन : पुण्यात शनिवारी शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. येत्या सोमवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन होणार आहे. यात नवीन खासदारांना शपथ दिली जाणार आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन सरकारला धारेवर धरलं जाणार असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले. संसदेत आम्ही शेतीविषयक अनेक प्रश्न मांडू, असंही पवार म्हणाले.
सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवू : विधानसभेच्या जागा वाटपबाबत पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आमच्या आघाडीची एकत्र बैठक होईल आणि त्यानंतर आम्ही जागा वाटपाच ठरवू आणि सत्ता परिवर्तनसाठी विधानसभा एकत्रितपणे लढवणार आहोत."
विधानसभेपूर्वी विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष : 2024 वर्षा अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. त्यामुळं विधानसभेपूर्वी विधान परिषद निवडणुकीकडं लक्ष देणार असल्याचं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा -
- हे सरकार जुमलेबाजांचं, मराठा-ओबीसींची करताहेत फसवणूक; सुप्रिया सुळेंची टीका - Supriya Sule PC
- विधानसभेत सत्ताधाऱ्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार उतरले आखाड्यात; नवीन रणनीती तयार - Assembly Election 2024
- अजित पवार भाजपासाठी 'नाकापेक्षा मोती जड'; पवारांना बाजूला कसं सारायचं? भाजपासमोर प्रश्न - Ajit Pawar