ETV Bharat / politics

"पक्ष चिन्हासारखं आमचं ग्राउंडही चोरीला गेलं, पण जनतेने निवडणूक...", रोहित पवारांचा अजित पवार गटावर हल्लाबोल - Lok Sabha Election 2024

Rohit Pawar Criticized Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पवार कुटुंबाची अधिक चर्चा होत असल्याचं बघायला मिळतंय. बारामतीच्या निवडणुकीमुळं हा संघर्ष अजूनच वाढत चाललाय. लोकसभा निवडणुकीमध्ये तर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर हल्लाबोल केलाय.

Rohit Pawar Criticized Ajit Pawar
अजित पवार आणि रोहित पवार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 5, 2024, 2:25 PM IST

आमदार रोहित पवार (Source- reporter)

पुणे Rohit Pawar Criticized Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघ यंदा चांगलाच चर्चेत राहिलाय. 7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार असून आज प्रचारासाठीचा शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवारांच्या शेवटच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी बारामतीत थेट लढत आहे. राष्ट्रवादी फुटल्यामुळं यंदा बारामतीत दोन्ही पवारांच्या सभा होणार असून या सभांकडं सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान, असं असतानाच आता या सभेवरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय.

काय म्हणाले रोहित पवार? : "गेल्या पन्नास वर्षांत शरद पवार बारामतीतील ज्या ग्राउंडवर सांगता सभा घ्यायचे ते ग्राउंड यावर्षी अजित पवार गटानं अगोदरच घेतले. दुसऱ्या ग्राउंडवर सभा घ्यावी लागत आहे. मात्र, ग्राउंड जरी नवीन असलं, तरी नेता आणि विचार तोच आहे," असं रोहित पवार म्हणालेत. "आमचा पक्ष चोरीला गेला. आमचं चिन्हं चोरीला गेलं. राजकीय यंत्रणा चोरीला गेली. तसंच आता आमचं ग्राउंड सुद्धा चोरीला गेलंय. आम्ही मागणी करून सुद्धा आम्हाला ते देण्यात आलं नाही," रोहित पवारांनी यावेळी सांगितलं.

पुढं ते म्हणाले की, "बारामतीतील जनता सुजाण असून ती आमच्याबरोबर आहे. अजित पवारांनी घेतलेली भूमिका आणि भाजपानं घेतलेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे साडेतीन लाखाच्या मताधिक्क्यानं निवडून येतील", असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला. "ही निवडणूक सर्वसामान्य जनतेनं हाती घेतली आहे. त्यामुळं काय करायचंय हे त्यांना चांगलं माहित आहे. म्हणून आम्हाला कसलीच चिंता नाही," असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. "बाकीचं नंतर बोला, आधी बारामतीत..."; पुतण्याचं काकाला थेट आव्हान - Rohit Pawar Challenge Ajit Pawar
  2. अहमदनगरात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे लढतीत आणखी एका 'निलेश लंके'ची उडी; रोहित पवारांचा विखेंवर हल्लाबोल - Lok Sabha election
  3. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? पाहा काय म्हणाले रोहित पवार - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.