ETV Bharat / politics

गांधी जयंती निमित्त राज ठाकरे यांचा वाचाळ वीरांना टोला - Raj Thackeray - RAJ THACKERAY

Raj Thackeray - महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे वाचाळवीर नेत्यांना टोला लगावला आहे. महात्मा गांधी म्हणायचे बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला मात्र अलीकडे काही वाचाळवीर काहीही बोलत सुटले आहेत आणि प्रसार माध्यम त्यांची दखल घेतात हे योग्य नसल्याचं राज ठाकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. गांधी जयंती निमित्त राज ठाकरे यांचा वाचाळ वीरांना टोला

राज ठाकरे
राज ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 2, 2024, 4:46 PM IST

मुंबई Raj Thackeray : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानं त्यांना जगभरात आदरांजली वाहण्यात येत आहे. विविध पक्ष संस्था संघटना आणि व्यक्तींकडून महात्मा गांधींना आदरांजली वाहिली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुद्धा महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानं फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्यातील वाचाळवीर नेत्यांचा समाचार घेतला आहे.

काय म्हणाले राज ठाकरे? - या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, महात्मा गांधींची आज जयंती आहे. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे बोलणं हे मौनापेक्षा प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला. मात्र याचा गर्भित अर्थ आज समाजातील अनेक नेत्यांना समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला प्रत्येक बाबतीत कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आधी व्यक्त व्हायचं हेच सध्या सर्वत्र सुरू आहे.

राज्यात वाचाळवीरांना बरे दिवस - राज्यात तर सध्या वाचाळ वीरांना बरे दिवस आल्याचं दिसत आहे. काहीही बोललं आणि बेताल वक्तव्य केली तरी त्यांना प्रसिद्धी मिळतं आहे. हे माहीत झाल्यामुळेच असल्या लोकांचा सुळसुळाट झाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. असे वाचाळवीर आणि त्यांचं बोलणं वाढतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देत आहेत आणि त्यात पुन्हा सोशल मीडियाची सुद्धा भर पडत आहे. या सगळ्यात गांभिर्य निघून जातं आणि कुठलाही विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण आता क्षणापुरता विचार न करता पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय, याचा विचार करायला हवा असंही राज यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा..

  1. 'लाडकी बहीण योजने'वरुन राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर; म्हणाले, "ही योजना बंद..." - Ladki Bahin Yojana
  2. विधानसभेचा 'फड' गाजवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांविरोधात मनसे देणार उमेदवार; नावही ठरलं - MNS Vs Devendra Fadnavis
  3. राज ठाकरे 'येक नंबर' चित्रपटात करणार भूमिका? आमिर खानसह ट्रेलर लॉन्चला लावली हजेरी - YEK NUMBER

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.