ETV Bharat / politics

Rahul Gandhi News: उद्योगपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना-राहुल गांधी - Rahul Gandhi Bharat Jodo Nyay yatra

Rahul Gandhi Maharashtra visit काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. राहुल गांधा यांचा नाशिकमध्ये रोड शो आणि सभा होणार आहे. तर सायंकाळी त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे पुजा करणार आहेत.

Rahul Gandhi Maharashtra visit
Rahul Gandhi Maharashtra visit
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 8:34 AM IST

Updated : Mar 14, 2024, 11:00 AM IST

नाशिक -Rahul Gandhi Maharashtra visit - खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला उत्तर महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारत जोडो यात्रा आज दुपारी नाशिकमध्ये पोहोचणार आहे. यावेळी होणाऱ्या रोड शोची काँग्रेसकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

काँग्रेस सेवादलाच्या वतीनं राहुल गांधी यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी तिरंग्यावर चरखा असलेला सर्वात मोठा 8 बाय 138 फूट झेंडा दिसून येणार आहे. काँग्रेस सेवा दलाचे पदाधिकारी सेवा दलाचा गणवेश घालून त्र्यंबक नाक्यावर उभे राहून काँग्रेसच्या माजी अध्यक्षांचे स्वागत करणार आहेत.

Live Updates

  • राहुल गांधी म्हणाले, "७२ कोटी लोकांकडं जेवढे पैसे आहेत, तेवढे पैसे देशातील २२ लोकांकडे आहेत. कोणत्याही राज्यात शेतकऱ्यांसाठी एमएसपी लागू करण्यात आली नाही. आमचे सरकार आल्यानंतर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजना लागू करण्यात येईल. पीक विमा योजनेत काही कंपन्यांना पैसा दिला जातो. मात्र, शेतकऱ्यांना नुकसान होऊनही कंपन्यांकडून पैसे मिळत नाही. त्यासाठी सरकार आल्यानंतर पीक विमा योजनेची पुनर्रचना करण्यात येणार आहे. शेतमाल निर्यात करताना सरकारकडून अचानक आयात-निर्यात धोरण अचानक बदलण्यात येते. आमचे सरकार आले तर शेतकऱ्यांचे हित करणारे आयात-निर्यात धोरण लागू केले जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लागू आहे. त्याबाबत निर्णय घेतला जाईल. सरकारचे दरवाजे शेतकऱ्यांसाठी सदैव खुले राहणार आहेत."
  • केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी लागू केल्यानं कांद्याचे दर घसरल्याचा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केला.
  • राहुल गांधी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, " शेतकरी प्रश्नावर मोदी सरकारचे मौन आहे. महागाई, बेरोजगारी आणि मुद्द्यावर मोदी सरकारचं मौन आहे. कांद्याच्या दराबाबत कोणतीही चर्चा केली नाही. पंतप्रधान मोदी कधी समुद्रात तर कधी विमानात जातात. त्यांच्या पाठीमागे माध्यमं जातात.
  • नरेंद्र मोदी सरकारनं तुमचे कर्ज किती माफ केले. एक रुपया कर्ज माफ केले नाही. उद्योपतींचे सरकारनं १६ लाख कोटी कर्ज माफ केले. हा आकडा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना समजत नाही. मात्र, उद्योगपतींना हा आकडा समजतो. मनरेगासाठी ६५ हजार कोटी रुपये लागतात. १६ कोटी लाख रुपये म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना आहे.

महिलेच्या घरी जाऊन साधला संवाद- राहुल गांधी यांनी रत्ना भिल या महिलेच्या घरी जाऊन संवाद साधला. यावेळी रत्ना यांच्या मुलानं जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत असल्याचं काँग्रसेच खासदार यांनी सांगितलं. या भेटीचा व्हिडिओ खासदार राहुल गांधी यांनी एक्स मीडियावर पोस्ट केला. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, देशातील प्रत्येक गरीब महिलेनं ‘महालक्ष्मी योजना’ काळजीपूर्वक समजून घेणे आवश्यक आहे. काँग्रेसनं प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला महालक्ष्मी मानून तिच्या खात्यात दरवर्षी लाख रुपये जमा करण्याचा संकल्प केला. ही केवळ योजना नसून अर्ध्या लोकसंख्येच्या उत्तम आरोग्याची, सुरक्षिततेची, सन्मानाची आणि समृद्धीची हमी असल्याचंही खासदार गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं.

चांदवडच्या सभेत राहुल गांधी काय बोलणार?= लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज सकाळी साडेआठ वाजता चांदवडला पोहचणार आहे. बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये होणाऱ्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभेत खासदार गांधी हे शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कांदा, द्राक्ष, टोमॅटो, ऊस, सोयाबीन आणि कापूस या पिकांचे घसरलेल्या बाजारभावार बोलणार आहेत. महागाई वाढल्यानं होणारे सर्वसामान्यांचे हाल यावरदेखील खासदार गांधी हे सभेतून प्रकाश टाकणार असल्याची माहिती माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी दिली.

त्र्यंबकेश्वर मंदिरात करणार अभिषेक- उत्तर महाराष्ट्र दौऱ्यांतर्गत राहुल गांधी यांची चांदवडला सकाळी 9 वाजता शेतकरी संवाद सभा होणार आहे. त्यानंतर ते पिंपळगाव बसवंत चौफुलीवर सकाळी 11 वाजता पोहोचून तिथे रोड शो झाल्यानंतर 12 वाजता ओझरला रॅली काढणार आहे. त्यानंतर ओझरहून द्वारकापर्यंत 2.30 वाजता पोहोचणार आहेत. तेथून त्यांच्या रोड शोला प्रारंभ होणार आहे. राहुल गांधी हे शालीमारवरील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तेथे चौक सभा होणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकेश्वरला पोहोचून तेथे अभिषेक तसेच पूजन होणार आहे.

  • या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद- द्वारका ते सारडा सर्कल, फाळके रोड ते दूध बाजार, त्र्यंबक नाका पोलीस चौकी ते खडकाळी सिग्नल, शालिमार चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा , सीबीएस सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नल या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.

    वाहनांसाठी असा असणार पर्यायी मार्ग- नाशिकरोडकडून द्वारकाकडं येणारी वाहतूक तिगरानिया रोडकडे वळण घेऊन तपोवन रिंग रोडनं पुढे मार्गस्थ होईल. काठे गल्ली सिग्नलकडून द्वारकाकडे येणारी वाहतूक डावीकडे वळण घेत भाभा नगर रस्त्याने मुंबई नाक्याकडे जाईल. भद्रकालीकडून दूध बाजारात येणारी वाहतूक सरळ तीवंदा चौकाकडे जाईल. खडकाळी सिग्नलवरून शालीमारकडे जाणारी वाहतूक जीपीओ रोड ने त्रंबक नाका सिग्नलकडे जाईल.

हेही वाचा-

  1. Bharat Jodo Nyaya Yatra : राहुल गांधी यांचं मालेगावात जोरदार स्वागत! जाहीर सभेतून गांधींची मोदींवर जोरदार टीका
  2. Rahul Gandhi : तरुणांना बेरोजगार ठेऊन मोदी सरकारने देशाची संपत्ती उद्योगपतींच्या घशात घातली - राहुल गांधी

Last Updated : Mar 14, 2024, 11:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.