ETV Bharat / politics

Pravin Darekar : महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला

Pravin Darekar On Bachchu Kadu : प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha Election 2024) महायुतीतील नेत्यांवर आणि पक्षांवर टीका केली होती. यावरून प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांना मोलाचा सल्ला दिलाय.

Pravin Darekar On Bachchu Kadu
प्रवीण दरेकर आणि आमदार बच्चू कडू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 4:43 PM IST

प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर

अमरावती Pravin Darekar On Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीवरून (Loksabha Election 2024) महायुतीतील नेत्यांवर आणि पक्षांवर टीका केली होती. यावरून प्रवीण दरेकर म्हणाले की, महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य बच्चू यांनी करू नये. त्यातून काहीही साधलं जाणार नाही. त्यांच्यासारख्या एका वरिष्ठ नेत्यानं जबाबदारीनं बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय. प्रवीण दरेकर यांच्याशी आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विविध विषयांवर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

विसंवादाची भूमिका बच्चू कडूंनी घेऊ नये : बच्चू कडू हे केवळ एका मतदार संघापुरतेच आमदार आहेत. भाजपाला मी घडवलं, मी उभं केलं अशी वक्तव्यं बच्चू कडू यांनी करू नये. अशा गोष्टींची गरज नाही. बच्चू कडू आज देखील आमच्या महायुतीत आहेत. महायुतीत विसंवाद निर्माण होईल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी टाळावं, असं देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

अमरावतीत कमळ चिन्हावरच राहणार उमेदवार : अमरावती मतदारसंघातील उमेदवारासंदर्भात आमचे वरिष्ठ निर्णय घेणार असले तरी, अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ चिन्ह असणाराच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्व अमरावतीच्या उमेदवाराबाबत योग्य तो निर्णय घेतील असं देखील प्रवीण दरेकर म्हणाले.

दरेकरांचा उद्धव ठाकरेंना टोला : खरंतर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात फिरायची गरज असताना उद्धव ठाकरे हे कुठे बाहेर गेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांशी कधी संवाद साधला नाही. आता पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आता कितीही फिरले तरी त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही, अशी टीका दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय.

हेही वाचा -

  1. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला
  2. Nashik Loksabha Constituency: महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना, खासदार श्रीकांत शिंदेंकडून थेट 'या' खासदाराची उमेदवारी जाहीर
  3. Supriya Sule On Vijay Shivtare : विजय शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवणार; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "लोकशाही..."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.