ETV Bharat / politics

"बाकीचं नंतर बोला, आधी बारामतीत..."; पुतण्याचं काकाला थेट आव्हान - Rohit Pawar Challenge Ajit Pawar - ROHIT PAWAR CHALLENGE AJIT PAWAR

Rohit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपले काका उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. "आमदार असताना त्यांनी बारामतीत कुठसी कंपनी आणली हे सांगावं," असं आव्हान त्यांनी अजित पवारांना दिलंय.

Rohit Pawar
नंतर बाकीचं बोला, आधी बारामतीत कोणती कंपनी आणली सांगा; पुतण्याचं काका अजित पवारांना थेट आव्हान
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 11:56 AM IST

रोहित पवार

पुणे Rohit Pawar : अजित पवारांनी शनिवारी सुप्रिया सुळे यांच्यावर भोरमध्ये एमआयडीसी आणण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं जोरदार टीका केली होती. पंधरा वर्षात एमआयडीसीचं काय झालं ते सांगा, असं म्हटलं होतं. त्यावरुन आता रोहित पवारांनी आपले काका अजित पवारांवर जोरदार टीका केलीय. तसंच बारामतीतील एमआयडीसीवरुनही थेट आव्हान दिलंय.

अजित पवारांनी काय केलं ते सांगावं : रोहित पवार म्हणाले, "अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तिकडं अजित पवारांनी कुठली कंपनी आणली हे सांगावं मग बाकी तालुक्यातील बोलावं. बारामती एमआयडीसीमधील कंपनी कोणी आणल्या? ते पण अजित पवारांनी सांगावं. महाविकास आघाडी सरकार आल्यावर नेत्यांना पदं मिळाली. नेत्यांनी विकास केला. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना निधी घेऊन गेले."

भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय : पूनम महाजन यांना मुंबईमधून भाजपानं तिकीट नाकारलं आहे. यामुळं भाजपामध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचं रोहित पवार म्हणाले. प्रमोद महाजन नाहीत, आता पूनम महाजन आहेत. भाजपामधील पुढच्या पिढीला तिकीट मिळालं नाही, भाजपा बदलेली आहे. बारामतीमधील भाजपा आमच्यासोबत असल्याचंही रोहित पवार म्हणाले.

अवघड जागेवर सभा घेत नाहीत : पुण्यात नरेंद्र मोदींची 29 तारखेला सभा होत आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "ही सभा बारामतीमध्ये होत नाही. अवघड सीट वाटते तिथं मोदींची सभा होत नाही. पुण्यात एक सभा आहे. त्यांना अवघड वाटतं तिथं सभा घेत नाहीत. धंगेकर पुण्यात प्लस आहेत. भाजपावर अनेकजण नाराज असून पुण्यात काँग्रेस पुढं आहे."

निवडणुकीनंतर बोलेन : अजित पवार गटाकडून तुम्हाला धमक्या येत आहेत का? यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, "माझा केजरीवाल होऊ शकतो. जे काही झालं ते मी लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर सांगेन."

हेही वाचा :

  1. अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का? पाहा काय म्हणाले रोहित पवार - Lok Sabha Election 2024
  2. रोहित पवार अन् दानवेंच्या आरोपानंतर आरोग्य मंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, रुग्णवाहिका खरेदीची निविदा प्रक्रिया पारदर्शक - Ambulance Scam
  3. आयपीएलच्या धर्तीवर आता 'महिला महाराष्ट्र प्रिमीयर लीग'ची घोषणा; रोहित पवार म्हणाले, "मैलाचा दगड..." - womens maharashtra premier league

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.