ETV Bharat / politics

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा; राज्यात राजकीय भूकंप होणार? - Sharad Pawar Met CM Eknath Shinde - SHARAD PAWAR MET CM EKNATH SHINDE

Sharad Pawar Met CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यात आज बंद दाराआड चर्चा झाली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Sharad pawar Meet to CM Shinde
शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 7:49 PM IST

मुंबई Sharad Pawar Met CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांच्या भेटीची अनेक दिवसांपासून चर्चा होती. या भेटीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शरद पवारांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यानंतर दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

आरक्षणावरुन चर्चा : दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन संघर्ष पेटलेला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तर काही दिवसांपूर्वी ओबीसींच्या आरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनीही उपोषण केलं होतं. दरम्यान, मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची सिल्वर ओक इथं अचानक भेट घेतली होती. यावेळी राज्यात आरक्षणावरुन जे वातावरण पेटलं आहे. जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यात आपण मध्यस्थी करुन हा वाद शांत करण्याची विनंती भुजबळांनी शरद पवारांना केली होती. यानंतर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आरक्षणाच्या विषयावर चर्चा करु असं पवारांनी म्हटलं होतं. यानंतर आज शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठा आंदोलकांना तुम्ही काय आश्वासन दिलं होतं? तसंच ओबीसी समाजाला तुम्ही काय आश्वासन दिलं होतं? हे सांगावं अशी मागणी शरद पवारांनी बैठकीत केल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यात सलोख्याचं वातावरण रहावं : राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये तसंच मराठा समाज आणि ओबीसी समाजात सलोख्याचं वातावरण राहावं, ओबीसी समाज आणि मराठा समाजात कुठलाही वाद होऊ नये, यासाठी आपण मध्यस्थी करु, असं शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांना बैठकीत सांगण्यात आल्याचीही माहिती समोर येत आहे. तसंच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाव्यतिरिक्त या भेटीत दुधाचे दर, जलसंपदा आणि साखर कारखान्यांचे काही रखडलेले प्रश्न यासह अनेक विषयांवर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली.

हेही वाचा :

  1. "शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, त्यांचं सरकार येताच आरक्षण..."; पुण्यातून अमित शाहांचं शरसंधान - Amit Shah on Sharad Pawar
  2. अमित शाहांची शरद पवारांवर टीका, सुप्रिया सुळेंनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाल्या, “हे ऐकून मला हसू…” - Supriya Sule

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.