पुणे Chhagan Bhujbal : अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानं गुरुवारी राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत भुजबळ यांनी, तुम्हाला कोणी सांगितल की मी नाराज आहे. माझी इच्छा आहे म्हणून तर मी नाशिक लोकसभा लढवण्यासाठी तयार झालो होतो. त्यांनी माझं तिकीट फायनल केलं होत म्हणून मी महिनाभर काम केलं, पण त्यानंतर निर्णय न झाल्यानं मी म्हटलं मी थांबतो कारण समोरच्या उमेदवाराकडून 1 महिन्यापासून तयारी सुरु झाली होती. मी माघार घेतल्यानंतर देखील अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा आधी उमेदवार जाहीर केला, असंही भुजबळ म्हणाले.
भुजबळ आज पुण्यात : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सध्या पुणे दौऱ्यावर असून भिडे वाड्याच्या संदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी त्यांना विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. भिडे वड्याची जागा ताब्यात घेऊनही काम सुरु होत नाही. तसंच फुलेवाड्यातील मोकळ्या जागेच्या संदर्भात बैठकीसाठी आज मी पुण्यात आलो. आज जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या समवेत या दोन्ही प्रश्नावर बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. भिडे वाड्याच्या बाबतीत जागा ताब्यात घेऊनही काम सुरु होत नाही. भिडे वाड्यात शाळा सुरु करण्याच्याबाबत काही अडचणी असून तिथं पार्किंग करण्यासाठी जागा नाही. तसंच आजूबाजूला अनेक शाळा असल्यानं शाळा बांधल्यास मुलं येणार का असे अनेक प्रश्न आहेत, मग तिथं इमारत तसंच कौशल्य विकास असं काही करता येईल का असे प्रश्न असल्याचं भुजबळांनी म्हटलंय.
आम्ही दोनच जागा लढवल्या : पक्षातील घडामोडींबाबत भुजबळ यांना विचारल्यावर पक्ष म्हटलं की सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणं होत नाही. त्यामुळं काही वेळा आपल्याला थांबावं लागतं. माझ्या 57 वर्षाच्या आयुष्यात असं अनेक वेळा झालंय. आपल्या जे वाटतं ते होत नाही, असं यावेळी भुजबळ म्हणाले. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महायुतीत अजित पवार यांना सोबत घेतल्यानं जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर त्यांचं नाराज होणं हे स्वाभाविक आहे. या निवडणुकीच प्रत्येकानं विश्लेषण केलं असून जसं आम्ही विश्लेषण केलं आहे तसंच त्यांनी देखील केलं आहे. पण जर आपण माहिती घेतली तर राज्यातील 48 जागांपैकी 4 जागा आम्ही लढवल्या आहे. त्यातील शिरुरमध्ये तर शिवसेनेचाच उमेदवार देण्यात आला होता तर परभणीमध्ये वेगळ्या पक्षाचा होता. त्यामुळं आम्ही फक्त बारामती आणि रायगड या दोन जागा लढवल्या आणि यातील एक जागा जिंकली आहे. मग 48 मतदारसंघात कसा परिणाम दिसला? देशातील दुसऱ्या राज्यात देखील फटका बसलाय, असं यावेळी भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :