ETV Bharat / politics

पाच वर्षात गडकरींच्या उत्पन्नात 116 टक्क्यांनी वाढ; वाचा महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंची किती आहे संपत्ती? - Nagpur Lok Sabha Constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 10:32 AM IST

Updated : Mar 28, 2024, 2:22 PM IST

Nagpur Lok Sabha Constituency : नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दाखल शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय.

पाच वर्षात गडकरींच्या उत्पन्नात 116 टक्क्यांनी वाढ; तर संपत्तीत महाविकास आघाडीचे ठाकरेही आहेत 'विकसीत'

नागपूर Nagpur Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालीय. नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार नितीन गडकरी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. नागपूर मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांकडे चल-अचल संपत्ती किती, बँक बॅलन्स, गाड्या किती आणि त्यांच्यावर एकूण दाखल गुन्हे किती याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नितीन गडकरींच्या उत्पन्नात 116 टक्क्यांनी वाढ : लोकसभा निवडणुकीच्या शपथपत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 1 कोटी 32 लाख 90 हजार 605 रुपये किंमतीची चल संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नी कांचन गडकरींच्या नावे 1 कोटी 24 लाख 86 हजार 441 रुपयांची चल संपत्ती आहे. याशिवाय एचयुएफ म्हणजेच हिंदू अविभक्त कुटुंबाच्या खात्यात 95 लाख 46 हजार 275 रुपयांची चल संपत्ती असल्याचंही त्यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केलंय. याशिवाय 2022-23 वर्षात नितीन गडकरी यांचं वार्षिक उत्पन्न 13 लाख 84 हजार 550 रुपये आहे. महत्वाचं म्हणजे 2019 मध्ये त्यांचं उत्पन्न 6 लाख 4 हजार रुपये इतकं होतं. त्यामुळं गेल्या 5 वर्षात नितीन गडकरी यांच्या उत्पन्नात 116 टक्क्यांनी वाढ झालीय. तर नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांचं उत्पन्न 40 लाख 62 हजार 140 आहे. तर एचयुएफचं उत्पन्न 8 लाख 23 हजार 530 इतकं आहे. या शिवाय नितीन गडकरी यांच्यावर 1 कोटी 66 लाख 82 हजार 750 रुपयांचं कर्ज सुद्धा आहे. तसंच त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्यावर 38 लाख 8 हजार 390 रुपयांचं व एचयुएफवर 4 कोटी 17 लाख 39 हजार 34 रुपयांचं कर्ज आहे. त्यांच्याकडं 31 लाख 88 हजार 409 रुपयांचे दागिने असून त्यांच्याकडं एकूण 6 कार आहेत. नितीन गडकरींवर दहा गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलय.

संपत्तीच्या बाबतीत विकास ठाकरेही कमी नाही : महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरतेवेळी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडं 9 कोटी 45 लाख 37 हजार 481 रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. तर 2019 मध्ये विकास ठाकरे यांच्याकडं 6 कोटी 54 लाख 12 हजार 43 रुपयांची चल आणि अचल संपत्ती होती. म्हणजेच 2019 ते 2014 या काळात 2 कोटी 91 लाख रुपयांनी विकास ठाकरे यांची संपत्ती वाढलीय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार ठाकरे पती आणि पत्नीवर 2 कोटी 92 लाख 58 हजार 69 रुपये इतकं कर्ज आहे. तर विकास ठाकरे यांच्यावर 1 कोटी 51 लाख 41 हजार 813 रुपयांचं कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर 1 कोटी 41 लाख 16 हजार 256 रुपयांचं कर्ज आहे. तसंच त्यांच्याकडं 121 ग्रॅम सोनं आहे. तर त्यांच्या पत्नीकडं 413 ग्रॅम सोनं आहे. विकास ठाकरे यांच्या नावानं 69 लाख 10 हजारांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावानं 6 कोटी 66 हजार 71 हजार 667 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिलीय. तर त्यांच्यावर विविध कलमांतर्गत वीस गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी आपल्या शपथपत्रात सांगितलय.

हेही वाचा :

  1. नितीन गडकरींनी नागपूर लोकसभेसाठी महायुतीकडून भरला उमेदवारी अर्ज, 5 लाखांनी विजयी होण्याचा गडकरींना विश्वास - Nitin Gadkari filed nomination
  2. नागपुरात नितीन गडकरींविरोधात ठाकरे काँग्रेसचा 'विकास' करणार का? - Nagpur Lok Sabha Constituency

Last Updated : Mar 28, 2024, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.