ETV Bharat / politics

Murlidhar Mohol Reaction : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या दुसऱ्या यादीत मोहोळ यांचा समावेश आहे.

Murlidhar Mohol
मुरलीधर मोहोळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 13, 2024, 10:42 PM IST

प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ

पुणे Murlidhar Mohol : भाजपाने दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात पुणे लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) भाजपाकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं पुणेकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कमळाला एक मतदान देतील आणि मला निवडून देतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदमध्ये व्यक्त केलाय.

पुणेकर मला मतदान करा : पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं पुणेकर मला मतदान करतील. आमची संघटना मजबूत आहे. आम्ही केलेली केंद्र सरकारच्या माध्यमातून कामे असतील, त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून काम असतील. मी महापौर असताना केलेले कामे या सगळ्याचे पाहता पुण्याच्या दृष्टीने जी योग्य कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न मी करीन असं मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले.

अनेक इच्छुकांची नावे : पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला पुणे विमानतळाचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यावेळेस गिरीश बापट यांची सुद्धा आठवण आली. अनेक इच्छुकांची यादी होती. अनेक नाराज आहेत असं बोललं जातंय, यावर बोलताना आमचा पक्ष म्हणून एक परिवार आहे आणि हा परिवार तिकीट देईपर्यंत इच्छुक असतात. त्यानंतर संपूर्ण एक, होतात सर्वजण मिळून उद्या सकाळी आम्ही कसबा गणपतीला अकरा वाजता आरती करणार असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलंय. भाजपाकडून माजी आमदार जगदीश मुळीक, सुनील देवधर, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे यांची नावे चर्चेत होती. अखेर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पुणे लोकसभेसाठी आता भाजपाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ हे निवडणूक लढवणार आहेत.

आम्ही प्रचंड मतानं निवडून येऊ : नाराजाची, चिंता करण्याची गरज नाही. पुणे लोकसभेची एक परंपरा आहे की, ज्यावेळेस अनिल शिरोळे खासदार होते, त्यानंतर गिरीश बापट खासदार झाले. त्यांच्या प्रचाराचा नारळ अनिल सुर्वे यांनी फोडला होता. त्यामुळं आम्ही प्रचंड मतानं निवडून येऊ, पुणेकर आम्हाला भरघोस मतानं आशीर्वाद देतील अशी भावना यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

  1. Bawankule On Padmakar Valvi : काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांचा भाजपा प्रवेश; काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसणार - चंद्रशेखर बावनकुळे
  2. Pravin Darekar : महायुतीत विसंवाद होईल, असं वक्तव्य करू नका...; प्रवीण दरेकरांचा बच्चू कडूंना सल्ला
  3. Uddhav Thackrey News : "भाजपानं निवडणुकीसाठी उमेदवार..", आघाडीत येण्याची ऑफर दिल्यानं गडकरींचा उद्धव ठाकरेंना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.