ETV Bharat / politics

मुरलीधर मोहोळांनी गाठलं 'शिवतीर्थ'; पुण्यासाठी ठरवला प्लॅन? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - MURALIDHAR MOHOL MEET RAJ THACKERAY

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी रविवारी (20 ऑक्टोबर) भेट घेतली. या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

MURALIDHAR MOHOL MEET RAJ THACKERAY
मुरलीधर मोहोळ यांनी घेतली राज ठाकरेंची भेट (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 20, 2024, 3:23 PM IST

Updated : Oct 20, 2024, 3:33 PM IST

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी पूर्ण झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीत प्रमुख लढत राहणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतलीय. मुरलीधर मोहोळ राज ठाकरेंच्या मदतीनं पुण्यातील राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत का? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाणं आलंय.

सदिच्छा भेट राजकीय भेट नाही : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून खटके उडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वय असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतय. निवडणुकीला सामोरे जाताना दगाफटका होऊ नये, यासाठी महायुतीकडून खबरदारी घेतली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी स्वबळाचा नारा दिला. त्याचा फटका महायुतीला बसू नये, यासाठी महायुतीकडून त्यांची मनधरणीचा प्रयत्न सुरू असल्याचा समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भेटीनंतर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी पुण्यात माझ्यासाठी सभा घेतली होती. त्यांची भेट घ्यायची राहिली. आजची भेट ही सदिच्छा भेट होती. यात कोणतीही राजकीय चर्चा नव्हती. पुण्यातील मनसेचे पदाधिकारी आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत यावर बोलताना मोहोळ म्हणाले, की त्यांचा आणि माझ्या भेटीचा काहीही संबंध नाहीय.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

लकवकरच उपाय शोधू : देशभरात गेल्या काही दिवसात विमानात बॉम्ब ठेवल्याचे कॉल सुरक्षा यंत्रणांना येत आहेत. यामुळं अनेक विमानांची तपासणी करूनच विमानं सुटत आहे. प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. यावर गुप्तचर यंत्रणांशी बोलून लवकरच ही समस्या सोडवण्यात येईल, असं केंद्रीय गृह राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारची धमकी आल्यानंतर विमानाची पूर्ण तपासणी करणं आवश्यक आहे. त्यामुळं प्रवाशांना त्रास होतोय, परंतु येत्या काही दिवसात यावर उपाय केले जातील असंही त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं.

पुण्यातील समीकरण बदलणार? : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 10 नेते शिवतीर्थावर दाखल झालेत. यात 2 शहरप्रमुख, 6 राज्य सरचिटणीस, 2 प्रवक्ते समावेश आहे. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण मधील 21 विधानसभा मतदारसंघाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहे. मुरलीधर मोहोळ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळं पुण्यातील काही समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील काही जागांवर राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देतात का? की सर्व जागांवर उमेदवार देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मुरलीधर मोहळ यांनी घेतलेल्या भेटीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा

  1. "...म्हणून अमित शाहांकडून राष्ट्रपती राजवटीचे कारस्थान"; संजय राऊतांचा गंभीर आरोप
  2. महाविकास आघाडीत अंतर्गत आजार, एक्स-रे अन् एमआरआय काढावे लागतील, संजय राऊतांचे सूचक वक्तव्य
  3. लाडकी बहीण योजनेला ब्रेक? मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं

Last Updated : Oct 20, 2024, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.