ETV Bharat / politics

"शिवसेना शिंदे गटाकडून तिकिट देण्याचं आश्वासन देऊनही मुलानं ऐकलं नाही, म्हणून..." गजानन कीर्तिकर यांचा गौप्यस्फोट - lok Sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 9:20 AM IST

मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत खासदार गजानन कीर्तिकर यांनी यू टर्न घेतला आहे. मात्र, पुत्र अमोल कीर्तिकर यांच्याविरोधात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमोल कीर्तिकर यांची ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांनी ही भूमिका सोमवारी रात्री स्पष्ट केली. अमोलला शिंदे गटाकडून तिकीट देण्याचं आश्वासन दिलं होतं, असा त्यांनी गौप्यस्फोट केला.

MP Gajanan Kirtikar on election contest
MP Gajanan Kirtikar on election contest

मुंबई: मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं कोण निवडणूक लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसताना गजानन कीर्तिकर यांनी भूमिका स्पष्ट केली. याच मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे लोकसभा निवडणूक लढवित आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या तिकिटावरून विजयी झाले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर गजानन कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. बदलत्या राजकीय स्थितीनंतर लोकसभा निवडणुकीत पित्रा-पुत्र आमने-सामने उभे ठाकलेले आहेत.

काय म्हणाले गजानन कीर्तिकर? महायुतीच्या व्यासपीठावरून बोलताना गजानन कीर्तिकर यांनी उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. गजान कीर्तिकर म्हणाले, " मुलाविरोधात निवडणूक लढविणार का, असा प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. पण, मी ही निवडणूक लढविणार आहे. यापूर्वी मला निवडणूक लढविण्यास सांगितलं होतं. मात्र, मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली तर त्याला रोखण्याचा प्रयत्न केल्याचा संदेश जाईल. या विचारानं मी स्वत:ला निवडणुकीपासून दूर ठेवले. माझ्यात टॅलेंट असून समाजात माझा सन्मान आहे. मी इतकी वर्षे राजकारणात आहे. पण, अमोल हा उद्धव ठाकरेंच्या पक्षातून निवडणूक लढवित असल्याचं कळलं. तेव्हा मी स्वत: अमोलला म्हणालो, तुला आमदार किंवा खासदार व्हायचे असेल तर हो. पण, वडिलांच्या विरोधात निवडणूक लढणार नाही, असे उद्धव ठाकरेंना छातीठोकपणे सांगायला लावलं. निवडणुकीत उतरायचे असेल तर दुसऱ्या ठिकाणावरून निवडणुकीत उभा राहा, असं अमोलला सांगितलं. मुलगा पुढे जात असताना वडील अडवित असल्याचं मत होईल. माझी समाजात प्रतिमा मलीन होईल. त्यामुळे उद्धव ठाकरे सोडून आल्यानंतर शिंदे गटाकडून तिकिट देईल, असे मुलाला सांगितलं. मात्र, मुलानं माझे ऐकले नाही. त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले, असे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

माध्यमांशी बोलताना खासदार कीर्तिकर काय म्हणाले? खासदार कीर्तिकर यांनी लोकसभा निवडणू लढविण्याबाबत काही वेळातच यूटर्न घेतला. खासदार म्हणाले, " निवडणूक लढविली नाही तरी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. मी महायुतीच्या राजधर्माचं पालन करणार आहे. मुलाच्या विरोधात महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहे. मी येथे दहा वर्षे शिवसेनेचा, भाजपाचा आणि आरपीआयचा खासदार आहे. अमोलला हरविण्यापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला निवडणून आणण्यासाठी काम करणार आहे. मात्र, निवडणूक लढविली तर मुलासाठी मागे हटलो, अथवा बॅकफूटवर गेल्याची चर्चा होईल, अशी भीती गजानन कीर्तिकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून सलग साडेतास चौकशी- मुंबई वायव्यचे उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार अमोल कीर्तिकर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अमोल कीर्तिकर फोर्ट परिसरात असलेल्या ईडी कार्यालयात दाखल झाले होते. खिचडी घोटाळा प्रकरणी अमोल कीर्तीकर यांची ईडी कार्यालयात साडेसात चौकशी झाली. ईडी कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी 'अमोल भैया आगे बढो हम तुम्हारे साथ है", अशा घोषणा दिल्या. "आपकी बार अमोल भैया खासदार, मोदी हमसे डरता है, ईडी को आगे करता है', अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी परिसर दणादणून सोडला. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांची 27 मार्चला लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषणा करण्यात आली. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, अमोल कीर्तिकर ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी वाढीव वेळ मागितला होता.

हेही वाचा-

  1. लोकसभा निवडणूक 2024 : मुंबईत 'बाप विरुद्ध बेटा' लढत होण्याची शक्यता
  2. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात कीर्तिकर पिता-पुत्राचा सामना रंगण्याची शक्यता
  3. मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी 4 जागांवर अद्यापही उमेदवारीबाबत घोळ कायम - Mumbai Lok Sabha Seats

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.