ETV Bharat / politics

"लहानपणापासून अनेक वेळा तक्रार करायचो आम्हाला वेळ कधी देणार, पण..."; कोल्हापुरात बोलताना श्रीकांत शिंदे पित्यासमोर भावुक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 12:35 PM IST

MP Shrikant Shinde Emotional : कोल्हापुरात सुरु असलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे बोलताना भावुक झाले. "लोकांच्या केलेल्या कामातून आज एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला आणि तो माझा बाप आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे," असं ते म्हणाले.

श्रीकांत शिंदे भावूक
श्रीकांत शिंदे भावूक
खासदार श्रीकांत शिंदे

कोल्हापूर MP Shrikant Shinde Emotional : कोल्हापुरात शिवसेनेचं (शिंदे गट) राष्ट्रीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. लहानपणापासून आतापर्यंत अनेक वेळा तक्रार करायचो आम्हाला वेळ कधी देणार, लोकांच्या व्यापातून या तक्रारीला कधीच उत्तर मिळालं नाही. अनेक जण माझा बाप चोरला म्हणून तक्रार करत आहेत. मात्र, लोकांच्या केलेल्या कामातून आज एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकला आणि तो माझा बाप आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचं सांगत खासदार श्रीकांत शिंदे भावनिक झाले.

मुख्यमंत्री पायाला भिंगरी लावून काम करत आहेत : अधिवेशनात बोलताना खासदार श्रीकांत शिंदे पुढं म्हणाले की, "शिवसेनेमध्ये सर्वोच्च पद कोणा एकासाठी राखीव नाही. 'ना सोऊंगा ना सोने दुंगा' हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ब्रीद वाक्य आहे. फक्त माझे कुटुंब म्हणजे माझी जबाबदारी नाही, तर माझा महाराष्ट्र म्हणजे माझी जबाबदारी असं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत केलंय. सिर्फ राजा का बेटा राजा नही होगा, जो मेहनत करेगा, वही राजा बनेगा, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री आहेत. शिवसेना तळागाळात घेऊन जात कार्यकर्त्यांना त्यांनी कधी मरु दिलं नाही त्यांना जगवण्याचं काम केलं. म्हणून आजही कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी मुख्यमंत्री शिंदे पायाला भिंगरी लावून काम करतात."

ठाकरेंना लगावला टोला : यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय. "आज माझा बाप चोरला म्हणून अनेक लोक आरडाओरडा करत आहेत. पण 'हिंदुहृदयसम्राट' बाळासाहेब ठाकरे कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. तो सर्वांचा बाप आहे आणि त्या बापाच्या विचारांवर चालून आज शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. कुठंही कधी दुर्घटना झाली, अतिशय दुर्गम ठिकाण असले तरी तिथं शिंदे सर्वप्रथम पोहोचले. नुसतं फेसबुक लाईव्ह करुन कोरडी आश्वासनं त्यांनी दिली नाहीत." या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

प्रत्येकानं एकनाथ शिंदे बनून काम करावं : या आधीचे मुख्यमंत्री आमदारांनासुद्धा बाहेर ताटकळत ठेवायचे, पण मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंनी 'वर्षा' निवासस्थानाची दारं सर्वसामान्यांसाठी खुली केली. मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, ''न खाऊंगा, ना खाने दूंगा'', याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांचंही ब्रीदवाक्य आहे, ''न सोऊंगा न सोने दूंगा.'' पक्ष पुढं घेऊन जायचं असेल तर प्रत्येकाला एकनाथ शिंदे बनून काम करायला हवं, असं आवाहनही खासदार शिंदेंनी यावेळी केलं.

हेही वाचा :

  1. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात; पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाहांच्या अभिनंदनाचे ठराव पारित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.