ETV Bharat / politics

मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं?; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांसह अमित शाहांना सवाल

Sanjay Raut on Eknath Shinde : आगामी निवडणुकांमुळं राज्याच्या राजकारणामध्ये आरोप- प्रत्यारोपांचं सत्र सुरूय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटीवरून निशाणा साधला होता. यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Raut on Eknath Shinde
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 2:12 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut on Eknath Shinde : शिवसेना पक्षाचं दोन दिवसीय महाअधिवेशन कोल्हापुर येथे संपन्न झालं. अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीवरून निशाणा साधलाय. तर उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात मातोश्री येथे बंद खोलीत चर्चा झाली नसल्याचा मोठा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. या दाव्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मातोश्रीच्या पायऱ्या कोण चढलं होतं? : महाविकास आघाडी सरकारकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीत गेले होते. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी खोचक टीका केली. तसेच बंद खोलीत अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालीच नाही, असा दावाही शिंदे यांनी केलाय. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्तीला काहीही बोलण्याचं लायसन्स महाराष्ट्राने दिलं नाही. अधिवेशनात ते बोलत असताना लोक उठून चालले होते याचा व्हिडिओ समोर आलाय."

खोलीत काय चर्चा झाली? : बंद दाराआड चर्चा होत असताना त्या ठिकाणी तुम्ही मातोश्रीवर उपस्थित होता का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला आहे. तसेच त्यावेळेस मी मातोश्रीवर उपस्थित होतो आणि कोण होते, कोण नव्हते हे माहिती आहे, असा देखील खोचक टोला त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लागवला आहे. त्यावेळी ते पक्षाचे नेतेही नव्हते, आम्ही सर्वांनी मिळून त्यांना पक्षाचा नेता केला, असंही सांगायला ते विसरले नाही. यावेळी भाजपाचे नेतेही होते ते गुलाम आणि नोकर झाले असून सगळ्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळं अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करत आहेत. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत काय चर्चा झाली ती शाह यांनी सांगावी, असंही राऊत म्हणाले.

हिम्मत असेल तर निवडणुका घ्या : 2014 साली भाजपाने युती तोडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत ते घाबरले. आपण जिंकू शकत नाही म्हणून त्यावेळी स्वतः तत्कालीन भाजपाध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर कशासाठी आले याचं उत्तर या महाशयांनी द्यावं. मोदी आणि अमित शाह यांच्याबरोबर राहून यांना खोटं बोलण्याचं व्यसन लागलं आहे. गांजा मारतात, खोटे बोलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. मी त्या बैठकीला उपस्थित होतो. आतमध्ये गेले चर्चा झाली. नंतर हॉटेल ब्लू सीमध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. आम्हाला तडजोड करायची असती तर केव्हाच केली असती, असंही राऊत म्हणाले.

बाळासाहेब जिवंत असते तर...: आम्ही पळपुटे, डरफोक नसल्याचंही संजय राऊत म्हणाले. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवली नाही. शिवसेनेच्या डुप्लिकेट अधिवेशनात मोदींना पंतप्रधान करण्याचा ठराव केला जातो. बाळासाहेब आता असते तर यांना कडेलोट केलं असतं. सतत दिल्लीत जाऊन हे वाकत असतात, असा टोला राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

स्वबळावर 300 निवडून आणा : भाजपाला 200 जागाही मिळणार नसल्याकारणानं फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. त्यासाठी कमलनाथ यांना फोडा, अजित पवार यांना फोडा अशा प्रकारचं फोडाफोडीचं राजकारण करत आहेत. मात्र, मला वाटतं कमलनाथ त्यांच्यासोबत जाणार नाहीत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात इतकी ताकत असेल तर स्वतःच्या ताकतीवर 400 नाहीतर 300 जागा निवडून दाखव्यात, असं थेट आव्हान संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय.

हेही वाचा -

  1. उघडा नागडा पोपट काय करतोय, आणखी चार खासदारांचे व्हिडिओ लवकरच बाहेर येतील - संजय राऊत
  2. पोलीस ठाण्यात गोळीबार म्हणजे स्वार्थासाठी महायुतीत गँगवार - संजय राऊत
  3. जागा वाटप ही प्राथमिकता नसून, देशात भाजपाचा पराभव हीच आमची प्राथमिकता : संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.