नाशिक- नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी लागले आहेत. तब्बल 24 तासांपासून नाशिकमध्ये मतमोजणी सुरू होती. शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी महाविकास आघाडीचे उमदेवार संदीप गुळवे यांचा पराभव केला आहे.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे (शिंदे शिवसेना) यांना मतमोजणीअंती 26 हजार 476 मते मिळाली. जिंकून येण्यासाठी 31 हजार 576 इतक्या मतांचा कोटा निश्चित केला होता. हा कोटा 19 व्या फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाची मते मिळविले. दराडे हे 32 हजार 309 मतांनी नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडून आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दराडे विजयी झाल्याचे जाहीर केलं.
अपक्ष उमदेवाराचा महाविकास आघाडीला फटका- नाशिक शिक्षक मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे, शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे आणि अपक्ष म्हणून विवेक कोल्हे रिंगणात उतरल्यानंतर निवडणूक चुरशीची झाली. नाशिक शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंती क्रमांकाचा कोटा पूर्ण न केल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतगणना करण्यात आली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर राहिले. बाद फेरीतील मतगणनेत 18 उमेदवार बाद झाले. महाविकास आघाडीचे संदीप गुळवेदेखील बाद झाले. वैध आणि अवैध मतांच्या पडताळणीनंतर विजयासाठी 31,576 चा कोटा निश्चित करण्यात आला. विजयासाठी दराडे यांनी दुसऱ्या पसंतीचे 5100 मत मिळविल्यानंतर त्यांचा विजय झाला. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाले. त्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमदेवाराचा महाविकास आघाडीला फटका बसल्याचे स्पष्ट झाले.
अशी मतमोजी प्रक्रिया पार पडली- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 64 हजार 853 मतदारांनी मतदान केले. त्यापैकी 63 हजार 151 मते वैध ठरली. तर 1 हजार 702 मते अवैध ठरली. 19 व्या बाद फेरीनंतर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे हे बाद झाले. तर अंतिम लढत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली. विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरीअखेर 17 हजार 393 मते पडली. तर सर्वाधिक पसंतीक्रमाची 6 हजार 72 मते पडली आहेत.
मतमोजणी प्रक्रियेत आढळल्या जास्त मतपत्रिका- शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रियेत एकूण पाच मतपत्रिका जास्त आढळल्या आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि येवला तालुक्यातील मतपेटीत प्रत्येकी 1 मतपत्रिका जास्त आढळून आली. तर चोपडा तालुक्यातील मतपेटीत 3 मतपत्रिका जास्त आढळून आल्या होत्या. यावर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ उडाल्याचे दिसून आलं. यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी चौकशी केली जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया सुरळीत सुरू झाली होती.
दुसऱ्या फेरीत अशी होती स्थिती
- किशोर दराडे 8408 मतांनी आघाडीवर
- संदीप गुळवे- 14 हजार 992
- किशोर दराडे -24 हजार 293
- विवेक कोल्हे -15 हजार 985
पहिल्या पसंतीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर अशी होती स्थिती
- किशोर दराडे 9628 मतांनी आघाडीवर
- संदीप गुळवे- 16 हजार 340
- किशोर दराडे -24 हजार 293
- विवेक कोल्हे -16 हजार 688
पहिल्या फेरीत अशी होती स्थिती
- पहिल्या फेरीत 30 हजार मतांची मतमोजणी पूर्ण, 34 हजार 846 मतमोजणी बाकी.
- किशोर दराडे 1175 मतांनी आघाडीवर
- संदीप गुळवे- 7 हजार 88
- किशोर दराडे -11 हजार 145
- विवेक कोल्हे -9 हजार 370
हेही वाचा-