ETV Bharat / politics

'बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला'; संजय राऊत, जितेंद्र आव्हाडांच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक - MLC Results 2024 - MLC RESULTS 2024

MLC Results 2024 : विधान परिषदेच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यावरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या आमदारांना महायुतीकडून कोट्यवधी रुपये आणि काही एकर जमीन दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या दोघांच्या आरोपांवर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.

MLC Results 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 5:12 PM IST

मुंबई MLC Results 2024 : विधान परिषदेच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबई विधान परिषदेच्या 11 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीनं सर्वच 9 जागा जिंकल्या. तर महाविकास आघाडीला तीन जागांपैकी दोन जागांवर विजय मिळवता आला. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा फायदा महायुतीला झाला. दरम्यान, यावरुन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काँग्रेसच्या आमदारांना महायुतीकडून कोट्यवधी रुपये आणि काही एकर जमीन दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या दोघांच्या आरोपानंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधानपरिषद निवडणुकीवर संजय राऊत, जिंतेद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी टीका केली आहे.

शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

बाप दाखवा आणि श्राद्ध घाला : दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला जो पराभवाचा धक्का बसलाय. त्यामुळं संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड अक्षरशः बावचळले आहेत. आमदारांना कोट्यवधी रुपयांची लेन-देन झाली. अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केलेत. पण जर तुमच्याकडे कोणतेही पुरावे असतील, फोटो, व्हिडिओ किंवा आणखी काय पुरावे असतील तर माध्यमांना त्या किंवा संबंधित जबाबदार यंत्रणा द्या. नाहीतर बाप दाखवा आणि श्राद्ध घाला.

अन्यथा माफी मागा : ज्यावेळेस भुजबळांनी पवारांच्यावर आरोप केले की, पवारांनी फोन केल्यामुळं महाविकास आघाडीतील नेत्यांनी सर्वपक्षीय मराठा आरक्षण बैठकीला आले नाहीत. यानंतर महासंसदरत्न सुप्रिया सुळे यांनी भुजबळ यांच्याकडं तसे पुरावे असतील तर द्यावं असं म्हटलं होतं. पण सुप्रिया तुमच्या वडिलांना एक न्याय आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय असं कसं चालेल?. मग आता महाविकास आघाडी मधील दोन नेत्यांनी जे आरोप केलेत. त्यांना विचारुन घ्या की तुमच्याकडे पुरावे आहेत का? आणि नसतील तर जे थातूरमातूर आरोप केलेत. ते आरोप थांबवा आणि आमची माफी मागा. अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. छगन भुजबळांची आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांवर टीका; म्हणाले, बारामतीवरून फोन आला अन्.... - Chhagan Bhujbal
  2. "बेसावध राहिलो, पण..."; विधानपरिषद निवडणुकीत पराभवानंतर जयंत पाटीलांनी व्यक्त केली खंत - MLC Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.