ETV Bharat / politics

"ठाकरे गट आणि संजय दिना पाटील यांना मराठी-गुजराती वाद...", नेमकं काय म्हणाले मिहीर कोटेचा? वाचा सविस्तर - Mihir Kotecha Exclusive Interview - MIHIR KOTECHA EXCLUSIVE INTERVIEW

Mihir Kotecha Exclusive Interview : मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत दिला. यावेळी बोलत असताना त्यांनी मराठी-गुजराती वादावरुन कोटेचा यांनी ठाकरे गट आणि संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Mihir Kotecha said Thackeray group and Sanjay Dina Patil created a Marathi-Gujarati conflict in the constituencies
मिहीर कोटेचा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 12:08 PM IST

Updated : May 9, 2024, 4:06 PM IST

मिहीर कोटेचा यांची मुलाखत (reporter)

मुंबई Mihir Kotecha Exclusive Interview : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात भाजपाकडून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपानं विद्यमान खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करून कोटेचा यांना उमेदवारी दिल्यानं या मतदारसंघांमध्ये मराठी-गुजराती वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. याच पार्श्वभूमीवर 'ईटीव्ही भारत'ने मिहीर कोटेचा यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न - प्रचाराला 10 दिवस उरले आहेत. कशा पद्धतीनं मतदारांकडे पाहता?

उत्तर - मी मागील 55 दिवसांपासून प्रचार करतोय. जनतेला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणून हवे आहेत. त्यामुळं ते मलाच मतदान करतील. तसंच विरोधकांकडं कुठलेच मुद्दे नसल्यानं ते फक्त आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

प्रश्न - विधानसभेच्या सहापैकी तीन मतदारसंघात तुमचे प्राबल्य आहे. परंतु इतर ठिकाणी काय? मराठी विरुद्ध गुजराती असा मतप्रवाह निर्माण झालाय का?

उत्तर - माझ्या विरोधकांनी एकही विकासाचं काम केलेलं नाही. मोदींच्या विकासाची गंगा मागील दहा वर्षांत घरोघरी पोहोचली आहे. 145 कोटी जनतेमध्ये मोदींचा विकास पोहोचलाय. त्यामुळं त्यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांकडं कुठलेच मुद्दे शिल्लक नाहीत. णि म्हणूनच ते भाषावादाकडं सर्वांचं लक्ष खेचत आहेत. परंतु जनतेला सर्वकाही माहित आहे. 2014 आणि 2019 मध्ये पण हेच झालं होतं. परंतु दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला. 2009, 2014 आणि 2019 या तिन्ही निवडणुकांमध्ये विधानसभा निहाय आकडेवारी काढली तर फक्त सहापैकी एकच विधानसभा अशी आहे. जिथं संजय पाटलांना लीड भेटला आणि ती म्हणजे 'मानखुर्द' आहे. त्यामुळं त्यांनी केलेल्या कामांचा आणि आम्ही केलेल्या कामांचा लोकांना चांगलाच अनुभव आहे.

प्रश्न - यंदा मुंबईतील विद्यमान तिन्ही खासदारांचे पत्ते कापले गेलेत. परंतु तुम्हाला विधानसभेवरून लोकसभेत पाठवण्याची तयारी करण्यात आली, याकडं कसं बघता.

उत्तर - भारतीय जनता पार्टीचा एक कर्मठ कार्यकर्ता म्हणून राष्ट्र प्रथम, पक्ष दुतीय आणि स्वतः शेवट असा माझा मूलमंत्र आहे. पक्षाकडून जो आदेश येतो, त्या आदेशाचं पालन करावं लागतं. मनोज कोटक असतील पूनम महाजन असतील किंवा गोपाळ शेट्टी असतील त्यांच्याबाबत पक्षानं जो निर्णय घेतला तो त्यांनी पाळलाय. कारण हा व्यवस्थेचा भाग आहे.

प्रश्न - तुमच्या मतदारसंघांमध्ये सव्वा ते दीड लाख मराठी मतांचा टक्का आहे. अशात राज ठाकरे तुमच्यासाठी प्रचार सभा घेतील का?

उत्तर - मी 1 मे रोजी राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सभा घ्यायची की नाही याबाबत आता राज ठाकरे ठरवतील. तसंच माझ्या मतदारसंघांमध्ये 6 हजार सोसायटी आहेत. त्यापैकी एका ठिकाणी मांसाहार खाणाऱ्यांना प्रवेश नाही. मात्र, त्यामुळं सर्व सोसायटीला दोषी ठरवणं चुकीचं आहे. हा फक्त ठाकरे गट आणि संजय पाटील यांनी निर्माण केलेला मुद्दा आहे.

प्रश्न - मुंबई उत्तर पूर्वमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पुनर्विकास, पाणी, डोंगर वस्ती याकडं कसं बघता..?

उत्तर - या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कोकणवासीय वसलेले आहेत. वर्षातून दोनदा ते तीनदा त्यांना गावी जावं लागतं. त्यामुळं मुलुंड मध्ये मुलुंड-टर्मिनस उभारण्यात यावं. इथून कोकण एक्सप्रेस सोडण्यात यावी. येत्या 10 वर्षात ईशान्य मुंबईला झोपडपट्टी मुक्त करावं. डोंगराळ भागात राहणाऱ्या 10 हजार मुलुंडकरांना पाण्याचा त्रास आहे. त्यांच्यासाठी 20 कोटी निधी महानगरपालिकेकडून मंजूर करून घेतलाय. गेल्या साडेचार वर्षात आमदार म्हणून मी वर्षातून 365 दिवस लोकांच्या सेवेसाठी दिलेत.

प्रश्न - संजय पाटील नावाचे अजून 2 उमेदवार तुमच्या विरोधात?

उत्तर - संजय पाटील यांचा एक मानखुर्द मधील व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये ते म्हणताय की, 'मैं ही आपको मेहफूस रख सकता हूॅं'. ही कुठल्या पद्धतीची भाषा झाली? दिवसभराचा माझा कार्यक्रम ठरलेला असतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. हे बघावं लागतं. पण ते केवळ हिंदू-मुस्लिम, मराठी-गुजराती यांच्यातच वाद घालतात.

प्रश्न - मुंबईतून जे विविध पक्षातील 4 विद्यमान आमदार खासदारकी लढताय, त्याच्यामध्ये तुमचं विजयाचं प्रमाण जास्त आहे?

उत्तर - मुंबईतील महायुतीचे सर्व उमेदवार लोकसभेची पायरी चढणार आहे. हे जनतेनं ठरवलंय. जनतेचा महायुतीवर प्रचंड विश्वास आहे. जनतेच्या आशीर्वादानं मी निवडून आल्यावर राज्य आणि केंद्रीय स्तराच्या विषयाबाबत माझं व्हिजन कसं असणार? याबाबत एक पुस्तिका मी दोन दिवसांमध्ये पब्लिश करेल.

हेही वाचा -

  1. मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? काय आहे मतदारसंघाचा इतिहास? - Mumbai North East Lok Sabha
  2. ईशान्य मुंबईत संजय पाटील नावाचे 4 डमी उमेदवार, मतदारांना संभ्रमित करण्याचं हे षडयंत्र असल्याचा संजय पाटील यांचा आरोप - North East Mumbai Lok Sabha
  3. शरद पवारांनी फेकला नवा राजकीय बॉम्ब, उद्धव ठाकरेंची होणार का अडचण? - Sharad Pawar

Last Updated : May 9, 2024, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.