ETV Bharat / politics

ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election - LOK SABHA ELECTION

Lok Sabha Election : ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे विश्वासू असलेले नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी दिली आहे. तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

Lok Sabha Election
ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचा हुकमी एक्का लोकसभेच्या रिंगणात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 10:41 AM IST

Updated : May 1, 2024, 3:38 PM IST

ठाणे Lok Sabha Election : महायुतीत ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मानले जाणारे नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे निकटवर्तीय मानले जातात. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाण्यात असताना नरेश म्हस्के हे नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शेजारी दिसतात. तसंच कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्रांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच घोषणा केली होती.

महायुतीकडून नरेश मस्के लोकसभेच्या रिंगणात : ठाणे लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर महायुतीकडून नरेश मस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं आहे. शिंदे गटाकडून यासाठी आग्रही मागणी होती. तर भाजपानं देखील या जागेसाठी जोर लावला होता. शेवटी शिंदे गटाकडून नरेश मस्के यांचं नाव जाहीर करण्यात आलं. शिंदे गटाकडून अनेक दिवसापासून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, संजय मोरे, मीनाक्षी शिंदे आणि नरेश मस्के यांच्या नावाची चर्चा सुरू होती. भाजपाकडून देखील संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, संजय केळकर यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

कोण आहेत नरेश मस्के? : नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिकेत दोन वेळा स्वीकृत सदस्य म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2012 रोजी शिवसेनेच्या तिकिटावरून पहिल्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचा कामाचा आलेख वाढतच गेला. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेते ही पदे त्यांनी भूषवली. 2014 साली विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवारी मागितली होती. यासोबत त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे महापौर पद देखील भूषवलं आहे. शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे नरेश मस्के हे, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे प्रवक्ते पदावर काम करत होते. त्यांनी आतापर्यंत राज्यातील सर्वच मोठ्या नेत्यांना सडेतोड उत्तर देत शिंदे गटाची बाजू मांडली आहे.

सर्वसामान्य कार्यकर्ता ते लोकसभेचा उमेदवार : नरेश मस्के हे शिवसेनेच्या भारतीय विद्यार्थी सेना या शाखेपासून ते आता लोकसभा उमेदवारापर्यंत पोहोचले आहेत. अनेक आंदोलने, पोलीस केसेस, निवडणुका लढून ते सर्वसामान्य कार्यकर्ता हे पद भूषवलं आहे. दरम्यान, त्यांनी हालाखीचे दिवस काढत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

हेही वाचा -

  1. मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut
  2. कुंभनगरी नाशिकमध्ये चार अध्यात्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढायचं भाजपाच्या तिकीटावर - lok sabha election
  3. 65 वर्षांच्या सत्तेमध्ये 80 वेळा बदलली घटना, तेव्हा तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम कुठं गेलं होतं; नारायण राणेंचा राहुल गांधींना सवाल - lok sabha election

Last Updated : May 1, 2024, 3:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.