ETV Bharat / politics

लोकसभेच्या एका जागेवर भाजपा, शिंदेंनी दरोडा टाकला - संजय राऊत - Sanjay Raut

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 2:09 PM IST

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी समाजांमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही भाष्य केलं. तसंच पेपरफुटी कायद्यावरही त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

Sanjay Raut
Sanjay Raut (Etv Bharat)

मुंबई Sanjay Raut : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईतील सहापैकी 4 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिलं आहे. मात्र उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबईतील लोकसभेच्या एका जागेवर भाजपा-शिंदे यांनी दरोडा टाकल्याचा आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईतील एका जागेवर दरोडा टाकला (Source reporter)

आमच्या एका जागेवर दरोडा टाकला : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अजून पर्यंत चर्चा झालेली नाही. त्यामुळं आम्ही एकत्र बसून कोण किती जागा लढवणार, हे ठरवणार आहे. हे महत्त्वाचं आहे की, यावेळी शरद पवार यांचा स्ट्राईकरेट सर्वात जास्त आहे. शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. आम्ही 21 जागा लढवल्या आणि 9 जागा जिंकल्या मात्र सर्वात जास्त टार्गेट आमच्या शिवसेनेला केलं गेलं. मुंबईतील एका जागेवर दरोडा टाकला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून ती जागा देखील आम्ही जिंकलो असतो. दोन-तीन जागा अशा आहेत की, आम्ही कमी फरकानं तिथं हरलो आहोत. आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. काँग्रेसचा देखील चांगला आहे. 288 जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं कोणाला जागा कमी पडणार नाहीत आणि सगळे आरामात लढतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

सर्वपक्षीय चर्चा व्हायला हवी : आरक्षणाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ''याबाबत राजकीय विधान करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा आहे. हे राज्याच्या सुरक्षितता आणि शांततेकरता योग्य नाही. बिहारमध्ये 50 टक्क्याच्या वर जे वाढीव आरक्षण होतं, ते न्यायालयानं मान्य केलं नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजात आरक्षणावरून संघर्षाची परिस्थिती दिसून येत आहे. हे सरकार काय करत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं सरकारनं चर्चा केली पाहिजे. शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता, उपोषणकर्ता सरकारवर विश्वास ठेवत नसतो. जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी देखील सांगितलय सरकारवर माझा विश्वास नाही. अशा परिस्थितीत सरकारवर उपोषणकर्त्यांचा विश्वास बसत नसेल तर यावर उपाय म्हणून सर्व पक्ष नेत्यांना किंवा समिती सोबत घेऊन सर्वपक्षीय चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.''

अटल सेतूची पायाभरणी काँग्रेस काळात : अटल सेतूवर तडे गेल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. काँग्रेसच्या काळात हा प्रकल्प सुरु झाला. नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत झाली. त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं हे योग्य नाही. काय प्रकरण आहे ते पाहावं लागेल, असंही ते पुढे म्हणाले.

सरकारनं उत्तर द्यावं : पेपरफुटीवरील कायद्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ''पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचार विरुद्ध कायदा, दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे देशात निर्माण झाले आहेत. पण गेल्या दहा वर्षांत एकही कायदा धड अमलात आला नाही. फक्त पीएमएलए कायदा अंमलात आला. पीएमएमए कायद्याचा वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला, बाकी कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. पेपर फूट सुरू आहे. आजही पेपर लीकच्या संदर्भात, भ्रष्टाचारविरोधात कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी का होत नाही? नवीन कायदे का निर्माण करावे लागतात? याचं उत्तर सरकारनं द्यावं.''

हेही वाचा

  1. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली 'ही' माहिती - BJP Core Committee Meeting
  2. 'ओबीसी आंदोलन सरकारसोबत मॅनेज; आमच्या नोंदी रद्द केल्या तर महागात पडेल', मनोज जरांगे यांचा इशारा - Maratha Reservation
  3. गेलेल्या आमदारांना परत घेणार का? जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? पाहा व्हिडिओ - Jitendra Awhad

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.