ETV Bharat / politics

वडील भाजपात अन् मुलगा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; कुटुंब एकच पण मुलं वेगवेगळ्या पक्षांकडून लढणार

विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत वडील भाजपात अन् मुलगा किंवा मुलगी शिंदेंच्या शिवसेनेत अन् पवारांच्या राष्ट्रवादीतून लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Children of politicians will contest from different parties
राजकारण्यांची मुलं वेगवेगळ्या पक्षांकडून लढणार (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

मुंबई- राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपावरून सुंदोपसुंदी कायम आहे. राजकीय पक्षांतर्गत अदलाबदली अन् नाराजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांनी रविवारी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय. त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत वडील भाजपात अन् मुलगा किंवा मुलगी शिंदेंच्या शिवसेनेत अन् पवारांच्या राष्ट्रवादीतून लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना माजी खासदार राजेंद्र गावित आणि विलास तरे यांनीही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. जून 2022 मध्ये शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केले, तेव्हा गावित यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. रविवारी 20 उमेदवारांची यादी जाहीर करणाऱ्या शिवसेनेने गावित यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलंय.

संदीप नाईक बेलापूर मतदारसंघातून लढणार: माजी मंत्री आणि भाजपाचे नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांनासुद्धा भाजपाकडून ऐरोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. तर पुत्र संदीप नाईक हे बेलापूर मतदारसंघातून भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु तिथून भाजपाच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळे संदीप नाईक यांनी 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केलाय. महाविकास आघाडीनं आता त्यांना मंदा म्हात्रे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

निलेश राणे कुडाळमधून रिंगणात: भाजपानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत कणकवली मतदारसंघातून विद्यमान आमदार नितेश राणेंना संधी दिलीय. नितेश राणे हे भाजपाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांचे पुत्र आहेत. तर नारायण राणेंचे दुसरे चिरंजीव निलेश राणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असून, ते कुडाळ मतदारसंघातून ते ठाकरे गटाच्या वैभव नाईक यांना आव्हान देणार आहेत.

नांदगावमधून समीर भुजबळ अपक्ष लढणार: अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर पुतणे समीर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघातून बंडखोरी केलीय. त्यामुळे समीर भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला असून, त्यांची शिंदे गटाच्या सुहास कांदे यांच्याशी लढत होणार आहे.

पुसद मतदारसंघात नाईक कुटुंब आमने-सामने: यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघावरही 1952 पासून सातत्याने नाईक घराण्याचं वर्चस्व राहिलेलं आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट आणि शरद पवार गट झाल्यानंतर नाईक घराण्यातही फूट पडली. मनोहरराव नाईकांचा एक मुलगा आणि आमदार इंद्रनील नाईक अजित पवारांबरोबर आहेत. तर त्यांचा मोठा मुलगा ययाती नाईक हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे पुसद मतदारसंघातही इंद्रनील नाईक विरुद्ध ययाती नाईक अशी लढत होण्याची शक्यता आहे.

आत्राम बापलेकीत लढत होणार: खरं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नात्यागोत्यातच वाद असल्याचं पाहायला मिळतंय. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार असलेल्या धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांच्याच मुलीनं बंड केलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 12 सप्टेंबरला भाग्यश्रीने शरद पवार गटात पक्ष प्रवेश केलाय. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली तेव्हा त्यांचा पक्षप्रवेश सोहळा झालाय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यामध्ये लढत होणार आहे.

हेही वाचा :

  1. अखेर ठरलं! वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा लढत; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले?
  2. बारामतीत आज धुमशान; अजित पवार आणि युगेंद्र पवार भरणार उमेदवारी अर्ज, शक्तिप्रदर्शनात कोण ठरणार वरचढ ?

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.