नांदेड : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण आहे, त्याचा फायदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत होईल. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मिळून ही निवडणूक लढवत आहे. त्यामुळं सत्तेत बसलेत, त्यांना आता सत्तेच्या बाहेर जावं लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट नांदेडला आले होते. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात वातावरण आहे, त्याचा फायदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत होईल.
महाविकास आघाडीचं सरकार येणार : विमानतळावर आगमन झाल्यानंतर सचिन पायलट यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सचिन पायलट स्वतः गाडी चालवत कार्यक्रमस्थळी दाखल झाले. "लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं काँग्रेसला साथ दिली आहे. या निवडणुकीतही महाविकास आघाडीला जनता साथ देणार आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार," असा विश्वास सचिन पायलट यांनी व्यक्त केला.
अशोक चव्हाणांबाबत भाष्य करण्यास टाळलं : दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री भाजपाचे नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसमध्ये होत असलेल्या छळामुळे पक्ष सोडल्याचं ते म्हणाले होते. मात्र सचिन पायलट यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत भाष्य करण्यास यावेळी टाळलं.
स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते सत्तेत बसले : "महाराष्ट्राच्या भविष्यासाठी आणि देशाच्या राजकारणासाठी ही विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधातील वातावरणाचा महाविकास आघाडीला फायदा होईल. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जे सत्तेत बसले आहेत, त्यांना यावेळेस सत्तेच्या बाहेर जावं लागेल. इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढत आहोत, आम्ही नक्की विजयी होऊ. काँग्रेस पक्षात आतापर्यंत अनेक लोक आलेत आणि अनेक जण गेलेत. परंतु काँग्रेस पक्ष हा आपल्या मेहनतीवर आणि आपल्या विचारधारेवर निवडणूक लढवत आहे.
हेही वाचा