नवी दिल्ली- एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणं एनडीएला लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळत नसल्याचं चित्र आहे. एवढेच नव्हे तर 2019 च्या निवडणुकीच्या निकालाप्रमाण पुनरावृत्ती करण्यात भाजपालाही अपयश आल्याचे सध्या चित्र आहे. सध्या एनडीएची 290 जागांवर आघाडीवर आहे. 2019 च्या तुलनेत उत्तर आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये जनतेने भाजपा आणि एनडीए आघाडीतील इतर पक्षांवर फारसा विश्वास दाखवला नाही.
भाजपाला हिंदी भाषिक राज्यांमध्ये आघाडी मिळविताना कसरत करावी लागत आहेत. दक्षिणेकडील कर्नाटक राज्यात मजबूत स्थिती असलेल्या भाजपाला धक्का बसत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, हरियाणा या राज्यांमध्ये पिछेहाट सुरू आहे. भाजपालानं उत्तर प्रदेशमध्ये 75 जागांवर निवडणूक लढवली होती. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला उत्तर प्रदेशमध्येदेखील फटका बसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागांपैकी भाजपाानं 71 तर 2019 मध्ये 62 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये 33 जागांवर आघाडी आहे.
- बिहार- भाजपानं बिहारमध्ये 17 जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपाची केवळ 9 जागांवर आघाडीवर आहे. तर, जेडीयूने 16 जागांवर निवडणूक लढविल्यानंतर 13 जागांवर आघाडीवर आहे. चिराग पासवान यांचा पक्ष पाचही जागांवर आघाडीवर आहे.
- राजस्थान-महाराष्ट्रातही भाजपासह एनडीएची पिछेहाट सुरू आहे. एनडीए 21 जागांवर तर महाविकास आघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे. राजस्थानमध्ये भाजपाला सर्व जागांवर विजय मिळविला होता. यंदा 25 पैकी 14 जागांवर भाजपाची आघाडी आहे.
- हरियाणा-हरियाणात लोकसभेच्या 10 जागांपैकी भाजपाची 5 जागांवर आघाडीवर आहे. तर 2019 मध्ये भाजपाने 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या.
- कर्नाटक- लोकसभेच्या 28 जागांपैकी भाजपाने 2019 मध्ये स्वबळावर 25 जागा जिंकल्या होत्या. मात्र आता भाजपाची केवळ 16 जागांवर आघाडीवर आहे. तर मित्रपक्ष जेडीएसची 2 जागांवर आघाडीवर आहे. पंजाबमध्येही भाजपाचे नुकसान झाले. केवळ एका जागेवर भाजपाची आघाडी आहे.
- आसाम- आसाममधील एकूण 14 जागांपैकी भाजप 9 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्येही भाजपाला 10 जागांवर आघाडीवर आहे. 2019 मध्ये भाजपाला 42 जागांपैकी 18 जागांवर विजय मिळाला होता.
महाराष्ट्रात काय स्थिती आहे?- महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा एनडीएचा दावा फोल ठरला आहे. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत आज दुपारी 1 वाजेपर्यंत काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर होती. तर शिवसेना (ठाकरे गट) 9 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) 7 जागांवर आघाडीवर होती. भाजपा 12 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना (शिंदे गट) 7 आणि राष्ट्रवादी ( अजित पवार गट) 1 मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांचा समावेश असलेली विरोधकांची महाविकास आघाडी 27 जागांवर आघाडीवर आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त मतदारसंघ जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. सांगलीत काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील उमेदवार आघाडीवर आहेत.
भाजपासह शिवसेनेची पिछाडी- भाजपानं 2019 मध्ये विजयी झालेल्या एकूण 35 खासदारांना 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, यापैकी 19 खासदार पिछाडीवर आहेत. भाजपाला सर्वाधिक फटका बसला असून, त्यांच्या 17 पैकी 12 खासदार पिछाडीवर आहेत. शिवसेनेने ( एकनाथ शिंदे गट) आठ खासदारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी 5 खासदार पिछाडीवर आहेत.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपानं 23 जागा जिंकल्या होत्या. तर त्याचा शिवसेनेला (अविभक्त) 18 जागा मिळाल्या होत्या. तत्कालीन राष्ट्रवादीने चार मतदारसंघात विजय मिळविला होता. तर काँग्रेसला फक्त चंद्रपूरची एक जागा जिंकता आली होती.
हेही वाचा-