ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार; 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार तोफा आज थंडावणार आहेत. शुक्रवारी 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

Lok Sabha Election 2024
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा आज थंडावणार; 'या' दिग्गजांचं भवितव्य पणाला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 2:52 PM IST

हैदराबाद Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा 26 एप्रिल रोजी होणार आहे. यात 13 राज्यांमध्ये 88 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. तर मध्य प्रदेशातील बैतूल मतदारसंघातील निवडणूक 9 एप्रिल रोजी बहुजन समाज पक्षाचे (BSP) उमेदवार अशोक भलावी यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगानं 7 मे (तिसरा टप्पा) वर हलवली आहे.

किती जागांवर होणार मतदान : दुसऱ्या टप्प्यात आसाममधील पाच, बिहारमधील पाच, छत्तीसगडमधील तीन, कर्नाटकातील 14, केरळमधील सर्व 20, मध्य प्रदेशातील सहा, महाराष्ट्रातील आठ, मणिपूरमधील एक, राजस्थानमधील 13 मतदारसंघात मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये, उत्तर प्रदेशात आठ, पश्चिम बंगालमध्ये तीन आणि जम्मू-काश्मीरमध्ये एक या मतदारसंघात मतदान होणार आहे.

दुसरा टप्पा प्रमुख मतदारसंघ : दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख मतदारसंघांमध्ये बिहारमधील किशनगंजचा समावेश आहे. आसाममधील सिलचर, छत्तीसगडमधील कांकेर, कर्नाटकात बंगलोर मध्य आणि बंगलोर दक्षिण, केरळमधील वायनाड, कोझिकोड आणि तिरुवनंतपुरम, मध्य प्रदेशातील दमोह आणि रेवा, महाराष्ट्रात अकोला, अमरावती, मणिपूरमधील बाह्य मणिपूर, राजस्थानमधील बाडमेर, कोटा, जालोर, अजमेर, उत्तर प्रदेशातील मथुरा आणि अलीगढ, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, बालूरघाट आणि जम्मू-काश्मीरमध्ये जम्मू या प्रमुख जागा आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख उमेदवार :

राहुल गांधी (वायनाड) : दुसऱ्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या मोठ्या नावांमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाडमधून नशीब आजमावणार आहेत. त्यांना दुसऱ्यांदा जिंकण्याची आशा आहे. गांधींचा सामना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्याशी आहे, तर सत्ताधारी डाव्यांनी ॲनी राजा यांना या जागेसाठी उमेदवार म्हणून पुढं केलंय. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून 55,120 मतांच्या मोठ्या फरकानं पराभूत झाल्यानंतर राहुल गांधी 2019 च्या निवडणुकीत वायनाडला गेले होते. वायनाडमध्ये गांधींनी सीपीआयच्या पी पी सुनीर यांच्या विरोधात 7,06,367 मतं मिळवली.

हेमा मालिनी (मथुरा) : प्रसिद्ध अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ही जागा त्या 2014 पासून भाजपाच्या तिकीटावर जिंकत आहेत. यावेळी त्या काँग्रेसचे उमेदवार आणि उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मुकेश धनगर यांच्या विरोधात आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, हेमा मालिनी यांनी 5,30,000 मतं मिळविली आणि राष्ट्रीय लोक दल (RLD) च्या कुंवर नरेंद्र सिंह यांच्यावर 2,93,000 मतांच्या मोठ्या फरकानं विजय मिळवला.

अरुण गोविल (मेरठ) : रामायण मालिकेतील रामाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते अरुण गोविल यांना मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय. गोविल यांचा बसपच्या देवव्रत कुमार त्यागी आणि सपाच्या सुनीता वर्मा यांच्याशी सामना आहे. 2019 मध्ये, भाजपाचे राजेंद्र अग्रवाल यांनी बसपच्या हाजी मोहम्मद याकूब विरुद्ध 5.86 लाख मतांनी विजय मिळवला होता.

  • इतर प्रमुख उमेदवारांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर (तिरुवनंतपुरम), छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल (राजनांदगाव), केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (जोधपूर), लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (कोटा), वंचित बहुजन आघाडी (व्हीबीए) प्रमुख प्रकाश आंबेडकर (अकोला) यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात परिस्थिती काय : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा जागांवर सुमारे 65 टक्के मतदान झालं होतं. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. शेवटचा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा :

  1. पहिल्या टप्प्यात देशात 60, तर महाराष्ट्रात 55 टक्के मतदान; बंगालमध्ये भरघोस मतदान; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती झालं मतदान? - Lok Sabha Election 2024
  2. मतदान झालेले ईव्हीएम आणि अधिकारी गडचिरोलीत हेलिकॉप्टरने मुख्यालयात परत - Lok Sabha Election 2024 Live Update

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.