ETV Bharat / politics

संजय राऊत वैफल्यग्रस्त, त्यांनी आधीच पराभव मान्य केला; राऊतांच्या आरोपाला शिंदे गटाकडून प्रतिउत्तर - Jyoti Waghmare On Sanjay Raut - JYOTI WAGHMARE ON SANJAY RAUT

Jyoti Waghmare On Sanjay Raut : राज्यात आज चौथ्या टप्प्याचं मतदान (Lok Sabha Election 2024) पार पडत आहे. मतदानाच्या दिवशीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केलाय. या आरोपाला शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून प्रतिउत्तर आलंय.

Jyoti Waghmare On Sanjay Raut
ज्योती वाघमारे आणि खासदार संजय राऊत (ETV BHARAT)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 5:16 PM IST

प्रतिक्रिया देताना ज्योती वाघमारे (Mumbai Reporter)

मुंबई Jyoti Waghmare On Sanjay Raut : शिवसेना (ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) एक व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) नाशिक येथे पैश्यांच्या बॅग घेऊन गेल्याचा आरोप केलाय. "मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले... नुसता पै पाऊस... दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे". असं पोस्टमध्ये म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. दरम्यान, राऊतांच्या या आरोपाला ज्योती वाघमारे यांनी प्रतिउत्तर दिलंय.

राऊतांचे आरोप बिनबुडाचे : संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. मुख्यमंत्री हे जनतेचे नेते आहेत. ते 20-20 तास काम करतात. लोकांमध्ये मिसळतात, लोकांना भेटतात, लोकांची कामे करतात, म्हणून त्यांना दोन-दोन कपड्यांच्या बॅगा लागतात. पण तुमच्या नेत्यांसारखे ते घर कोंबडे नाहीत आणि त्या घर कोंबड्यांना बॅगा नाहीतर पैशांचे कंटेनर लागतात. हे राज ठाकरेंनी आधीच सांगितलंय. त्यामुळं चोराच्या मनात चांदणं. त्यामुळं दिसली बॅग की, त्याच्यात पैसेच असणार असं तुम्हाला वाटतंय, असं ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय.

तुम्ही पराभव मान्य केलाय : "संजय राऊत यांनी कधीही आयुष्यात कुठली निवडणूक लढली आहे का? असा प्रश्न ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांना विचारला आहे. राऊत हे साधं त्यांच्या सोसायटीच्या निवडणुकीत सुद्धा निवडून येणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला काय माहिती पडणार की, निवडणूक काय असते? निवडणुका या जनतेचं प्रेम, विश्वास आणि कामावर जिंकता येतात. तुमच्या या वैफल्यग्रस्त वक्तव्यामुळं तुम्ही निवडणुकीत तुमचा आधीच पराभव मान्य केलाय. हे आता महाराष्ट्राला कळलंय," अशी टीका ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांच्यावर केलीय.

हेही वाचा -

  1. "मुख्यमंत्र्यांनी पैसे वाटपाकरिता हेलिकॉप्टरमधून १२ ते १३ कोटी रुपये नेले, लवकरच..."- संजय राऊतांचा आरोप - Sanjay Raut news today
  2. "संजय राऊतांची सुरक्षा फक्त १५ मिनिटं हटवाच अन्...."; नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane on Sanjay Raut
  3. "राज ठाकरेंच्या भूमिकेमुळं बाळासाहेबांच्या आत्म्याला...'; संजय राऊतांची टीका - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.