मुंबई Jitendra Awhad On Car Attack : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळं त्यांच्या गाडीवर आज (1 ऑगस्ट) स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी आव्हाडांनी संभाजीराजेंवर सडकून टीका केली. तसंच यापुढं आपण संभाजीराजेंना मान देऊन बोलणार नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? : यावेळी बोलत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी संभाजीराजे यांनी गद्दारी केली आहे. यापुढे त्यांना तुम्ही असे म्हणणार नाही. मी मेलो तरी त्यांची माफी मागणार नाही. विरोधात वागणार असतील तर विरोधात बोलणार आहेत. राजर्षी शाहू महाराजांचं जे रक्त होतं, ते सर्वांना बरोबर घेऊन जाणारं होतं. भांडणं लावणारं रक्त नव्हतं, असा त्याचा अर्थ होता. मात्र, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा एक टक्काही या संभाजींराजेंकडं नाही आहे. जातीजातीत, धर्माधर्मात भांडण लावणारे शाहू महाराजांचे वंशज कसे होतील?", असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला. "ज्यांनी दगड मारलाय त्यांना माझी कारवाई व्यवस्थित समजावून सांगेन," असा सूचक इशाराही आव्हाडांनी दिला.
जितेंद्र आव्हाडांवरील हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांकडून रास्तारोको : जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई नाशिक महामार्ग रोखला होता. यामुळं मुंबईकडून नाशिककडं जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. या रास्ता रोको दरम्यान, जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
हेही वाचा -
- प्रभू श्रीरामांबाबत वादग्रस्त वक्तव्य भोवले! आव्हाड यांच्या विरोधातील गुन्हे शिर्डीत वर्ग करण्याचे न्यायालयाचे निर्देश - Jitendra Awhad News
- फुटलेल्या आमदारांना जोड्याने मारा; विधानपरिषदेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया - Jitendra Awhad
- नागरी नक्षली विधेयक महाराष्ट्रासाठी घातक, हे विधेयक आम्ही मंजूर होऊ देणार नाही; जितेंद्र आव्हाड - urben nakshali bill