ETV Bharat / politics

वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो...; विजय शिवतारेंची बारामतीतून माघार घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया - Vijay Shivtare - VIJAY SHIVTARE

Vijay Shivtare : माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. पुरंदरमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय.

Vijay Shivtare
विजय शिवतारे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 9:53 PM IST

प्रतिक्रिया देताना विजय शिवतारे

पुणे Vijay Shivtare : बारामती लोकसभेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विरुद्ध बंड केलेले विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून (Lok Sabha Elections) माघार घेतल्याची घोषणा केलीय. शिवतारे यांनी सासवडमध्ये समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा निर्णय झाला आहे.

जनहितासाठी घेतली माघार : बारामती लोकसभेतील अजित पवार आणि तुमचा विरोध मावळला का? यावर बोलताना शिवतारे म्हणाले की, वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो, अजित पवार सुद्धा बदलतील. शिवाजी महाराजांना सुद्धा तह करावा लागला. पुरंदरचा तह देखील शिवाजी महाराजांनी केला. त्याचप्रमाणे हा राजकीय तह आहे. इथल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यामुळं शेवटी जनहितासाठी मी माघार घेत असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय.

खासदार अडचणीत येत आहेत : मी लोकसभा निवडणूक लढवली तर काय होणार आणि मी नाही लढवली तर काय होणार. हे मी लोकांना समजावून सांगितलं. मला सुद्धा वेळ लागला परंतु आता आम्ही ठरवलं आहे की, महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएचा फोन आला आणि म्हणाले बापू आपल्याला माघार घ्यावी लागेल. कारण आपल्यामुळं आपला नेता अडचणीत येतोय. 20 ते 30 खासदार अडचणीत येत आहेत, त्यामुळं मी माघार घेत असल्याचं विजय शिवतारे म्हणाले.

विकास कामांना निधी : मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. फक्त जनतेच्या विकासासाठी मी माघार घेत आहे. माझ्या भागातल्या विकास कामांना निधी देण्याचं मान्य केल्यामुळंच मी माघार घेत असल्याचं विजय शिवतारे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. साताऱ्यात दोन्ही राजेंचं मनोमिलन! शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजेंची 'जादू की झप्पी' - Udayanraje Meet Shivendraraje
  2. 'गरिबी हटाव नाही, तर गरीब हटाव', ही भाजपाची नीती; आदित्य ठाकरे यांनी सुनावले खडेबोल - Aditya Thackeray
  3. बारामतीचं ठरलं! नणंद विरुद्ध भावजय लढत, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर - Supriya VS Sunetra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.