ETV Bharat / politics

'मला पंतप्रधान पदाची ऑफर, पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं...'; नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट - Nitin Gadkari PM Post

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 9:03 AM IST

Updated : Sep 15, 2024, 11:49 AM IST

Nitin Gadkari PM Post Offer : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण असेल, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. यातच नितीन गडकरी यांचे नाव कायम आघाडीवर असते. अशातच त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Nitin Gadkari PM Post
नितीन गडकरी (ETV Bharat Reporter)

नागपूर Nitin Gadkari PM Post Offer : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर लगेच 'मला पंतप्रधान पदाची ऑफर होती' असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. विरोधीपक्षाच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असं देखील ते म्हणाले. पंतप्रधान होणं माझ्या जीवनाचं लक्ष्य कधीही नव्हतं. मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं. नितीन गडकरींच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नितीन गडकरी (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले गडकरी : लोकसभा निवडणुकीवेळी मला विरोधी पक्षातील एका नेत्याकडून पंतप्रधान पदासाठी पाठिंब्याची ऑफर आली होती. मी त्यांची ऑफर धुडकावली होती. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, तुम्ही मला पाठिंबा का द्याल आणि मी तुमचा पाठिंबा का बरं घेऊ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना खळबळजनक दावा केला आहे. तसंच मी माझ्या तत्त्वाशी तडजोड करत नसल्याचं ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारल्याचं स्पष्ट केलं असलं तरी यामुळं राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते.

प्रामाणिक नेत्यांचा सन्मान व्हायलाचं पाहिजे : याच कार्यक्रमादरम्यान बोलताना नितीन गडकरी म्हणाले, 'एक भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते मला भेटण्यासाठी आले होते. चर्चा सुरु असताना मी त्यांना सहज म्हणालो नागपूर आणि विदर्भात ए.बी. वर्धन मोठे नेते होते. त्यावर ते म्हणाले, ए.बी. वर्धन तर संघाचे विरोधी होते?' त्यावर मी म्हणालो, 'प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांचाही सन्मान करायला हवा. ज्याच्या विरोधात बेइमानी आहे, त्यांचा सन्मान कोण करेल' असा प्रश्न मी त्यांना केला असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा :

  1. अमित शाहांचा मुंबई दौरा संपताच अजित पवार मध्यरात्री 'वर्षा'वर; तीन तास चर्चा - DCM Ajit Pawar Meet CM
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीशांच्या घरी; राऊत म्हणाले, "पक्ष संपवण्यासाठी मदत..." - Sanjay Raut On PM Narendra Modi

Last Updated : Sep 15, 2024, 11:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.