ETV Bharat / politics

आमदार सतेज पाटलांच्यात इतका बालिशपणा आला कुठून; मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल

Hasan Mushrif On Satej Patil : कोल्हापूर लोकसभेवरून (Lok Sabha Election 2024) मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्यामध्ये जुंपली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याच्या सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा मंत्री मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. आदर असेल तर शाहू छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीने बिनविरोध करावे, असं आवाहन करण्याइतका बालिशपणा सतेज पाटील यांच्यात आला कोठून? अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिलीय.

Satej Patil On Hasan Mushrif
मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 6:00 PM IST

प्रतिक्रिया देताना मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर Hasan Mushrif On Satej Patil : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) जसजशी जवळ येत आहे, तशा आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराजांचे नाव जवळपास निश्चित मानलं जात असताना महायुतीच्या नेत्यांना जर महाराजांप्रती आदर असेल तर त्यांनी ही जागा बिनविरोध करावी, असं आवाहन काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) यांनी केलं होतं. याला महायुतीचे मंत्री हसन मुश्रीफांनी (Hasan Mushrif) जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सतेज पाटलांना इतका बालिशपणा आला कुठून? असा सवाल करत मंत्री मुश्रीफांनी सतेज पाटलांवर निशाणा साधला आहे.

सतेज पाटील यांचा घेतला समाचार : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांचे नाव पुढे येत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराजांनी राजकारणात येऊ नये, त्यांच्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर असल्याचं विधान केलं होतं, याला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उत्तर देत महायुतीच्या नेत्यांना श्रीमंत शाहू महाराजांबद्दल आदर असेल तर त्यांनी कोल्हापूर लोकसभेची जागा बिनविरोध निवडून द्यावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाचा आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी खरपूस शब्दात समाचार घेत आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केलं. कोल्हापूर लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडं आहे. त्यामुळं महायुती आणि मुख्यमंत्री शिंदे जो उमेदवार देतील त्याचा प्रचार करणं आणि त्याला निवडून आणणं ही आमची जबाबदारी आहे. सध्यातरी संजय मंडलिक हेच महायुतीचे उमेदवार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

समरजित घाटगेंना रिंगणात उतरवणार? : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीनं महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण करून ठेवलंय. महविकास आघाडीनं छत्रपती घराण्यात उमेदवारी दिल्याच्या चर्चेनं महायुतीनं देखील नवीन खेळी खेळली असून शाहू महाराजांविरोधात भाजपा नेते समरजीत घाटगेंना उमेदवारी देत नवीन रणनीती आखत असल्याची माहिती समोर आलीय. मागील अनेक दिवसांपासून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल मतदारसंघात असलेल्या नाराजीमुळं त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी चर्चा सुरू होती. सध्या एकीकडं मंडलिक आपणच उमेदवार असेल असं सांगत असले तरी, दुसरीकडं मात्र कोल्हापूरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवरती अनेकांनी समरजित घाटगे यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती समोर आलंय. जागा वाटपात ही जागा कोणाला जाणार यावर समरजीत घाटगे कोणत्या चिन्हावरून निवडणूक लढवणार हे ठरवण्यात येणार आहे.

बंटी पाटील- मुश्रीफ मैत्रीत मिठाचा खडा : गेली दोन तप जिल्ह्याचे नेतृत्व केलेल्या मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील या जोडीने सबंध जिल्ह्यात सहकारात मुसद्देगिरी दाखवत जिल्ह्यातील अनेक संस्था आणि साखर कारखाने आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी मोट बांधली होती. मात्र राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळं मंत्री मुश्रीफ महायुतीचा घटक झाले तर आमदार सतेज पाटील महाविकास आघाडीचे नेते म्हणून नेतृत्व करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचा मतदारसंघ असलेल्या गडहिंग्लज येथे जनता दलाचे नेते दिवंगत श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची आमदार पाटील यांनी भेट घेतल्यानंतर, मुश्रीफ आणि पाटील यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातय. कितीही राजकीय विरोध झाला तरी एकमेकांवर टीका न करणारे मंत्री मुश्रीफ आणि पाटील आता एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आपल्या मतदारसंघात आमदार पाटील जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचा राग म्हणूनच आज मंत्री मुश्रीफांनी आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केल्याचं बोललं जातय.

हेही वाचा -

  1. Jitendra Awhad Questions Mushrif : या वयात पवारांना त्रास देणं मुश्रीफांना शोभतं का? जितेंद्र आव्हाडांचा सवाल
  2. Hasan Mushrif On Kolhapur Visit : मंत्री हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत, मात्र राजकीय घडामोडींवर मौन
  3. Political Crisis : विकासकामांसाठी मंत्री मुश्रीफ भाजपसोबत; कागल मतदार संघातील सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.