ETV Bharat / politics

महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेद वाढीस लागल्याचं चित्र? - MAHAVIKAS AGHADI

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. आता मविआमधील मतभेद वाढीस लागल्याचं चित्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनातील घडामोडींमध्ये दिसून आले.

Mahavikas Aghadi
महाविकास आघाडी (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 9:59 PM IST

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानं मविआतील घटकपक्षांमध्ये दुरावा वाढीस लागल्याची चिन्हे दिसत आहेत. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मविआतील घटक पक्षांमधील स्वतंत्र कारभार समोर आला. त्यामुळं ही आघाडी आता फुटीकडं मार्गक्रमण करत असल्याची चर्चा सुरु झाल्याची माहिती, राजकीय विश्लेषक जयंत माईनकर यांनी दिली.

समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी शपथ घेतली : अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मविआतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना (उबाठा) या पक्षांच्या विजयी उमेदवारांनी आमदारकीची शपथ घेऊ नये असा निर्णय घेतला होता. मात्र, मविआचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी त्यांना न जुमानता पहिल्याच दिवशी आमदारकीची शपथ घेतली. उध्दव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार मिलींद नार्वेकर यांनी वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल समाजवादी पक्षाने जाब विचारत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांना उत्तर देण्याऐवजी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्याचा आरोप केला.

पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अभाव : दुसरीकडं, मविआने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीत सहकार्य करत बिनविरोध अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला असताना आदित्य ठाकरे यांनी मात्र शिवसेना उबाठा पक्षाचा या निवडप्रक्रियेवर आणि मंत्री परिचयावर बहिष्कार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, विधानभवनाच्या प्रांगणात आदित्य ठाकरे हे बहिष्काराची माहिती माध्यमांना देत असताना विधानसभेच्या सभागृहात मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शप पक्षाचे आमदार मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कामाचे गोडवे गात होते. त्यामुळं मविआतील प्रमुख पक्षांमध्ये सुसंवाद आणि समन्वयाचा अभाव असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर आपल्याला शपथ न घेण्याबाबत मविआकडून काहीही माहिती मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

"विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये चाललेला हा वाद आहे. मात्र विरोधकांकडं या पदासाठी आवश्यक असलेली संख्या नसल्यानं त्यांना हे पद मिळणं कठीण आहे. मात्र विरोधी पक्षनेते पदाला असलेले महत्त्व आणि त्याला मिळणाऱ्या सुविधा पाहून हा लोण्याचा गोळा पटकावण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्यातूनच एकमेकांना डावलण्याचा आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांची विचारधारा वेगळी असल्यानं त्यांचे विचार वेगळे असणं साहजिक आहे. त्यामुळं असं छोटे मोठे वाद होत राहतील, मात्र त्यामुळं लगेच मविआ फुटेल, असं वाटत नाही. शिवसेनेला आगामी महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी हिंदुत्वाचा आधार घ्यावा असे वाटत आहे. मात्र त्यांनी तसे केल्यास त्यांना सध्या काँग्रेस राष्ट्रवादीकडून मिळणारी मुस्लिम आणि दलित मते देखील गमावण्याचा धोका आहे. - जयंत माईनकर, राजकीय विश्लेषक

महाविकास आघाडीची वाटचाल फुटीच्या दिशेने : इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यावरुन केंद्रीय पातळीवर वाद सुरु झाले आहेत. त्याचा परिणाम राज्यातील महाविकास आघाडीच्या वाटचालीवर देखील होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी ममता बॅनर्जीनी उत्सुकता दाखवल्यावर शरद पवारांनी देखील ममता बॅनर्जी मध्ये इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यामुळं या घडामोडींमुळं कॉंग्रेसमध्ये देखील नाराजीचं वातावरण आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडीची आगामी वाटचाल फुटीच्या दिशेने होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्याचं जयंत माईनकर म्हणाले.

हेही वाचा -

  1. विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतच जुंपली; दिल्लीचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार?
  2. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या मतांमध्ये तफावत? निवडणूक आयोगानं दिलं थेट स्पष्टीकरण
  3. "बांगलादेशात अन्याय होत असलेल्या हिंदूंना भारतात आश्रय द्या", महंत रामगिरी महाराजांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.