ETV Bharat / politics

"बारामतीची लढाई ही शरद पवार, अजित पवारांची नाही, तर..."; बारामतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnvis - DEVENDRA FADNVIS

Devendra Fadnvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शरद पवार, राहुल गांधी तसंच सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 7:47 AM IST

पुणे Devendra Fadnvis : 'काही लोकांना असं वाटतं बारामतीची लढाई ही शरद पवार आणि अजित पवारांची आहे. काहींना वाटतं ही लढाई सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची आहे. मात्र असं नसून, खऱ्या अर्थानं ही लढाई नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली आहे', असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी इंदापूर दौऱ्यावर होते. तिथं भारतीय जनता पक्षाच्यावतीनं भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला संबोधित करताना फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते.

प्रत्येकवेळी सुप्रिया सुळेंचा विरोध : या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बारामती लोकसभा मतदारसंघातून कोणीही निवडून आलं, तरी या देशात फार मोठा बदल घडणार आहे, अशी परिस्थिती नाही. मात्र देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं, याची ही खरी लढाई आहे. महायुतीचा उमेदवार निवडून आला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल आणि त्यांना समर्थन दिलं जाईल." यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंवरही निशाणा साधलाय. "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात जे जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया सुळेंनी केला. तुम्ही लोकसभेमधले एकूण एक भाषण काढा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक निर्णयाचं अगदी काश्मीर संदर्भातील 370 कलम हटवण्याच्या संदर्भातील केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मांडलेल्या बिलालाही सुळे यांनी विरोध केला," अशी टीका फडणवीस यांनी सुळेंवर केलीय. "त्यामुळं आता बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांनी हे ठरवायचं की, व्यक्ती मोठा नाही."

राहुल गांधी आणि शरद पवारांवरही टीका : "ही शरद पवारांच्या विरोधातली लढाई नाही. बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या देशाच्या विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल हे मतदारांनी ठरवायचं आहे." असं म्हणत फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधलाय. "आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत जाईल, तशी ही निवडणूक एक प्रकारे भावनिक मुद्द्यांवर जाईल," असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधलाय.

हेही वाचा :

  1. भिवंडीमध्ये मविआत फूट? बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्यानं बंडखोरीची शक्यता - LOK SABHA ELECTION 2024
  2. उस्मानाबादची लोकसभेची जागा बदला अन्यथा सामूहिक राजीनामे देणार, शिवसेना कार्यकर्ते आक्रमक - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.