ETV Bharat / politics

“मी नागपुरी, मला...”, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला - Devendra Fadnavis - DEVENDRA FADNAVIS

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray : मुंबईमध्ये तीन जागा भाजपा आणि तीन जागा शिवसेनेनं लढवायच्या हा निर्णय अगोदरच झाला होता, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. ते आज (30 एप्रिल) नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते.

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray In Nagpur
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 10:53 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी (30 एप्रिल) दुपारी नागपुरात आले असता, यावेळी नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली. तसंच उद्धव ठाकरे यांच्यात असलेल्या निराशेमुळं ते माझ्यावर सातत्यानं टीका करत असतात, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्या जाणाऱ्या सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्यानं भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत असल्याचं बघायला मिळतंय. यासंदर्भात फडणवीसांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "ठाकरेंमध्ये असलेल्या निराशेमुळं ते माझ्यावर अशाप्रकारे टीका करतात. मी तर अस्सल नागपुरी आहे, मला त्यांच्या पेक्षाही खालच्या पातळीवर जाऊन बोलता येतं. पण मला ते शोभत नाही. मॅच्युअर्ड राजकारणी तसं बोलत नसतात." तसंच समोर पराभव दिसत असल्यानं ते अशा भाषेचा वापर करतायत. पण त्यांनी शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना जवळ करणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले.

नारायण राणेंनी केलेल्या आरोपावरही दिली प्रतिक्रिया : बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक त्रास उद्धव ठाकरेंनी दिल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केलाय. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले की, "त्याकाळी नारायण राणे शिवसेनेच्या जास्त जवळ होते. आम्ही तर तिथं नव्हतो. नारायण राणे यांच्याकडं या बद्दलची सर्व माहिती आहे. त्यांना आलेल्या अनुभवाच्या आधारे ते बोलले असतील", असं फडणवीस म्हणाले.

मी पंतप्रधान मोदींचा आभारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. यासंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, "मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मला महाराष्ट्रात जो काही विकास करता आला. त्यातून जी प्रतिमा तयार झाली, त्यानंतर महाराष्ट्रानं माझा स्वीकार केला. हे सर्व करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यामागे खंबीरपणे उभे होते, आणि त्यामुळंच हे सर्व शक्य झालं."

हेही वाचा -

  1. विरोधक जिंकतात त्यावेळी ईव्हीएम मशीन बरोबर, मग हरतात तेव्हा आक्षेप का? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न तर राऊतांचा फडणवीसांवर भ्रष्टाचाराचा आरोप - CM Eknath Shinde
  2. शरद पवारांनी दाखवलेल्या नरेंद्र मोदींच्या व्हिडिओला फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, कोलांट्या उड्या शब्दावरून राजकारण तापलं - Deputy CM Devendra Fadnavis
  3. "पराभवाच्या हताशेनं शिवीगाळ...", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.