ETV Bharat / politics

"मुंबई लुटणार्‍या घोटाळेखोरांना...", देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी - Devendra Fadnavis - DEVENDRA FADNAVIS

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ रविवारी (12 मे) मुंबईत विक्रोळी येथे सभा घेण्यात आली. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Social Media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 7:26 AM IST

मुंबई Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : आज (13 मे) राज्यात लोकसभेच्या 11 जागांसाठी चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. तर 20 मे रोजी पाचव्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील सर्व 6 जागांचा समावेश असून याकरिता आता मुंबईत प्रचारानं जोर धरला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाचे भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचारार्थ रविवारी (12 मे) विक्रोळी, मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी सभेला संबोधित करत असताना फडणवीसांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? : यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आज मुंबईतील मराठी माणूस बेघर झाला असून त्याला वसई-विरारला जाऊन राहण्याची वेळ आली आहे. हे (ठाकरे गटाचे नेते) लोक कोविड काळात लोकांची सेवा करण्याचं सोडून फक्त घोटाळे करण्याचं काम करत होते. गरिबांच्या खिचडीमध्ये पैसे कमावणारे आणि दुर्दैवानं मरण पावणाऱ्या लोकांच्या कफनात देखील घोटाळा करणारे हे 'खिचडी आणि कफन चोर' आहेत. कोविड काळात हजारो लोक मरण पावले, परंतु यांनी ऑक्सीजनमध्येही घोटाळा केला. त्यामुळं ही निवडणूक साधी नाही, ज्यांनी ज्यांनी मुंबईकरांना नाचवलं, मुंबईकरांच्या जिवावर स्वतःची संपत्ती केली, अशा सर्वांना जाब विचारायची ही निवडणूक आहे."

"आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईतील सर्व प्रमुख रस्त्यांचं काँक्रीटीकरण आम्ही सुरू केलंय. आधी पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर केवळ आणि केवळ चर्चा व्हायच्या. दरवर्षी रस्ते बनवण्याच्या नावाखाली यांनी गरिबांचे करोडो रूपये खाल्ले. कोस्टल रोड पासून अटल सेतुपर्यंत आम्ही अनेक प्रकल्पांची निर्मिती केली, परंतु उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या अशा एका तरी आयकॉनिक प्रकल्पाचं नाव सांगावं."

झोपडपट्टी वासीयांना पक्कं घर देणार : पुढं ते म्हणाले की, "आपले उमेदवार मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी जे काही संकल्प केलेत, ते पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. एसआरए ही आधी घोटाळ्यांची राजधानी होती, परंतु आमच्या काळात त्यास वटणीवर आणण्याचं काम झालं. आता एसआरएला गती मिळाल्यामुळं संक्रमण शिबिरातील लोकांसमवेत सर्वांना घरं मिळतील. मोदींच्या नेतृत्वात लवकरच झोपडपट्टी वासीयांना पक्कं घर देण्याचं काम आम्ही करणार आहोत. मुंबईच्या विकासाला गती देण्यासाठी उत्तर पूर्व मुंबई भागातील मतदार मिहीर कोटेचा यांच्यामार्फत आपली बोगी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या इंजिनाला जोडतील", हा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. "1999 पासूनच उद्धव ठाकरे...", देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट - Devendra Fadnavis
  2. अनिल देशमुखांचा गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिला इशारा; म्हणाले"निवडणुकीच्या काळात..." - Devendra Fadnavis
  3. "सुप्रिया सुळेंना सर्वकाही..."; अजित पवार का बाहेर पडले? देवेंद्र फडणवीसांनी थेटच सांगितलं.... - Devendra Fadnavis On NCP

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.