ETV Bharat / politics

गुढीपाडव्याला मनसे 'एनडीए'त सहभागी होणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले... - lok sabha election 2024

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

Devendra Fadnavis
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 4:07 PM IST

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महाराष्ट्रातील पहिली सभा आज विदर्भातील चंद्रपुर येथे होत आहे. नरेंद्र मोदीच्या सभेसाठी प्रचंड उत्साह दिसत असल्याचं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. ते आज नागपूर येथील निवासस्थानी बोलत होते. मोदींच्या सभेनंतर वातावरण बदलत आहे. आधीच महाराष्ट्रात एनडीएला अनुकूलता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर अनुकूलता आणखी वाढेल. १० एप्रिल रामटेक लोकसभा मतदारसंघातही नरेंद्र मोदींची सभा होणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

गुडीपडव्याला मनसे एनडीएमध्ये सहभागी होईल का? : एनडीएमध्ये मनसेला सोबत घेण्याच्या संदर्भातील चर्चा गेल्या काही काळात झाल्या होत्या. मनसेनं जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला आहे तेव्हापासून आमची त्यांच्यासोबतची जवळीक वाढलीय. राज ठाकरे यांनी 2014 पासूनच मोदींना पाठिंबा दर्शवला होता. नरेंद्र मोदीं यांना पंतप्रधान केलं पाहिजे अशी जाहीर भूमिकाही त्यांनी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचा विकास केलाय. अशा परिस्थितीत सर्वांनी मोदींच्या पाठीशी उभं राहायला पाहिजं. खास करून राष्ट्रीय विचारानं हे प्रेरित आहे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे अशा सर्वांनी मोदींसोबत राहिलं पाहिजं. म्हणून मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत राहील. अर्थात त्यांचा पक्ष आहे, निर्णय त्यांना घ्यायचा आहे. मात्र, यावेळेला माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी मोदींना पाठिंबा दिला पाहिजे.

सुनेत्रा पवार या बारामती येथून निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा नरेंद्र मोदींना असेल. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर त्यांचा पाठिंबा राहुल गांधींसाठी असेल. सुनेत्रा पवार यांना दिलेलं मत मोदींसाठी जाईल. तर सुप्रिया सुळे यांना दिलेलं मत राहुल गांधींना जाईल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

रत्नागिरी सिंधुदुर्गसह सर्व उमेदवार एकाचं वेळी जाहीर करू : रत्नागिरी-सिंधुदुर्ग उमेदवार केव्हा जाहीर होईल या संदर्भात विचारलं असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उर्वरित ज्या ही जागा आहेत त्यांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत. प्रचार तर सुरू केला पाहिजे. कारण उमेदवार कोणीही असला तरी प्रचार कामीच येतो. महायुतीच्या सर्व मित्र पक्षांनी प्रचार सुरू केला पाहिजे.

तर एकनाथ खडसे यांचे स्वागत करू : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन कोणीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असेल, तर त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप अधिकृतरित्या पक्षानं कळवलेलं नाही. जेव्हा पक्ष अधिकृतरित्या आम्हाला कळवेल तेव्हा आम्ही त्यांचं स्वागत करू.

हेही वाचा -

  1. खिचडी घोटाळ्यात संजय राऊत हे मुख्य सूत्रधार, ईडीनं त्यांना अटक करावी-संजय निरुपम - Khichdi scam
  2. लोकसभा निवडणूक 2024 : माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात - Lok Sabha Election 2024
  3. मी देशासाठी लढतोय, 'देशी'साठी नाही; सुधीर मुनगंटीवारांची प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.