ETV Bharat / politics

विधानसभा निवडणूक 2024 : ठाकरे गटाकडून मुलाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बबनराव घोलप स्वगृही परतणार?

देवळाली मतदारसंघातून माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळं बबनराव घोलप पुन्हा स्वगृही परतणार असल्याचं बोललं जातंय.

Deolali Assembly constituency Baban Gholap son Yogesh Gholap has beed announced as a candidature from shivsena thackeray group
बबनराव घोलप (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2024, 10:52 AM IST

नाशिक : माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आठ महिन्यापूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे गट) सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आता बबनराव घोलप यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं बबनराव घोलप हे देखील पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. बबनराव घोलप हे रविवारी (27 ऑक्टोबर) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे गट) घरवापसी करणार असल्याचं सांगितलं जातंय.

योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर : महाविकास आघाडीत देवळाली मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाली आहे. माजी आमदार योगेश घोलप यांनी या जागेसाठी एबी फॉर्म मिळवलाय. याआधी, लोकसभा निवडणुकीनंतर देवळालीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळणार असल्याची चर्चा होती. इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसनं मेळावा घेऊन आपला उमेदवार देण्याची घोषणा देखील केली होती. या पार्श्वभूमीवर देवळालीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटासह इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार होते. पण, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून देवळाली मतदारसंघातील शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून होते. अखेर चर्चेनंतर या जागेचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूनं लागला आणि माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

नाशिक शहराच्या तीन जागा ठाकरे गटाकडं : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं नाशिक शहरातील तीन जागा आपल्या हाती घेतल्यानं त्यांचा प्रभाव वाढलाय. यापूर्वी शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात माजी आमदार वसंत गीते आणि सुधाकर बडगुजर यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर आता देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना उमेदवारी जाहीर झालीय. त्यामुळं नाशिक शहरात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

माजी मंत्री बबनराव घोलप यांची कारकीर्द : माजी मंत्री बबनराव घोलप हे देवळाली विधानसभा मतदार संघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर गेले आहेत. राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांची कन्या नयन घोलप-वालझाडे यांना ठाकरे गटानं नाशिकच्या महापौरपदी विराजमान केलं होतं. तर मुलगा योगेश घोलप यांना विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरे यांनी दिली होती.

हेही वाचा -

  1. शिंदेंविरोधात केदार दिघे लढणार; ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, महाविकास आघाडीची 270 जागांवर सहमती
  2. कुर्ला विधानसभा मतदारसंघातील ठाकरेंच्या संभाव्य उमेदवाराला स्थानिकांचा विरोध, नेमकं कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.