ETV Bharat / politics

दसरा मेळाव्याची ठाकरे गटाची अनेक वर्षांची परंपरा मोडीत, 'हे' आहे कारण - UDDHAV THACKERAY DASARA MELAVA

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा ही शिवसेनेची जुनी परंपरा आहे. यंदाही शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघणार आहे.

UDDHAV THACKERAY DASARA MELAVA
उद्धव ठाकरे (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2024, 5:26 PM IST

Updated : Oct 12, 2024, 6:58 PM IST

मुंबई : आज संपूर्ण राज्याचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याकडं लागलंय. हे दोन्ही नेते आपल्या दसरा मेळाव्यात नेमकं काय बोलणार? याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दादरच्या शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असून, संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे येण्यास सुरुवात झालीय. मात्र, यावर्षी ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जमिनीवर बसण्याची अनेक वर्षांची परंपरा मोडीत निघणार आहे.

शिवाजी पार्कमध्ये चिखल : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अनेक दसरा मेळाव्यातील भाषणं याच मैदानावर गाजलीत. त्याच भाषणांमधून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळालीय. ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला एक परंपरा आहे. या दसरा मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे शिवसेनेचे कार्यकर्ते जमिनीवर बसून बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायचे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषणही कार्यकर्ते जमिनीवर बसून ऐकत आले आहेत. मात्र, मागील काही दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसानं आता शिवाजी पार्कमध्ये चिखल साचला असून, कार्यकर्त्यांना बसण्याची गैरसोय झालीय.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा (Source - ETV Bharat Reporter)

कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था : साधारण ऑक्टोबर महिन्यात पावसानं बऱ्यापैकी दडी मारलेली असते. त्यामुळं शिवाजी पार्कचं मैदान त्यामानानं कोरडे असतं. त्यामुळं या मैदानावर कार्पेट टाकून कार्यकर्त्यांची बसण्याची व्यवस्था केली जात होती. मात्र, यंदा पावसामुळं शिवाजी पार्क मैदानात चिखल झाल्यानं कधी नव्हे ते दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं भाषण कार्यकर्ते आता खुर्चीत बसून ऐकणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे काय संबोधित करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला असून, शिवाजी पार्क येथील वाहतूक मार्गातदेखील बदल करण्यात आलेत.

हेही वाचा

  1. 'ते' सोनं लुटत आहेत, तुमच्या हातात आपट्याची पानं, राज ठाकरेंचा पॉडकास्टवरून हल्लाबोल
  2. मुंबईतील दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट
  3. "आचारसंहिता लागल्यावर भूमिका मांडणार, उलथापालथ करावी लागणार", मनोज जरांगे पाटलांचा इशारा

Last Updated : Oct 12, 2024, 6:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.