दंतेवाडा Dantewada NMDC Plant Accident : बस्तरच्या दंतेवाडा NMDC प्लांटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी SP3 च्या स्क्रिनिंग प्लांटमध्ये खडक कोसळल्यामुळं चार जण दबल्याची घटना घडली आहे. तसंच एक पोकलेन मशीन देखील खडकात दबलं आहे. अपघातानंतर प्लांटमध्ये बचावकार्य सुरू असून दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
एनएमडीसी प्लांटमध्ये बचावकार्य सुरू : दंतेवाडा एनएमडीसी प्लांटमध्ये झालेल्या या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू आहे. जिल्ह्यातील किरंदुल शहराजवळ NMDC च्या SP3 चा नवीन प्लांट स्थापन होत आहे. यादरम्यान हा अपघात झाला असून त्यात चार मजूर जमिनीत दबले आहेत. कटरसह ड्रिलिंग मशिननं खडकाला कापण्यात येत असून प्लांटच्या उभारणीसाठी बांधकाम सुरू आहे.
"या अपघातात सुरुवातीला 6 मजूर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. यातील दोन मजुरांनी पळून आपला जीव वाचवला आहे. मात्र चार जणांना पळून जाण्यात यश न आल्यानं ते जमीनीत दबले आहेत. यातील दोन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तसंच बाकीच्या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.": आर.के. बर्मन, एएसपी, दंतेवाडा
कामगारांनी दिला होता इशारा : कामगारांनी सांगितलं की, डोंगर खोदण्याचं काम एका कंपनीला देण्यात आलं आहे. कोलकाता येथील एक कंपनीकडून हे खोदकाम सुरू होते. मंगळवारी डोंगरात खोदकाम सुरू होतं. डोंगराच्या खालीच नाल्याच्या बांधकामासाठी कास्टिंग केलं जात होतं. ड्रिलिंगमुळं डोंगरात तीव्र कंपनं निर्माण झाली. कास्टिंगचं काम करणाऱ्या कामगारांनी याबाबत कंपनीच्या पर्यवेक्षकांना माहिती देऊन ड्रिलिंग थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र त्यांनी काम थांबवलं नाही. काही वेळानं खडक खचल्यानं कामगार त्याखाली गाडले गेले.
हे वाचलंत का :